Dog Bite esakal
लाइफस्टाइल

Dog Bite : कुत्रा चावल्यानंतर इन्फेक्शन होऊ नये म्हणून लगेच करा या १० गोष्टी

कुठलाही कुत्रा चावल्यास लगेच जखम साफ करून घ्यावी. आणि डॉक्टरांकडे धाव घ्यावी.

साक्षी राऊत

Dog Bite : कुत्रा हा पाळीव प्राणी अनेकांच्या घरी पाळला जातो. मात्र अनेकांना कुत्र्याची भिती देखील वाटते. कुत्र्याचे दात रूतल्यास किंवा कुत्र्याने अचानक तुमच्यावर हल्ला केल्यास जखमेवर इन्फेक्शन होऊ नये म्हणून लगेच काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे.

भारतात जवळपास २० लोकांचा मृत्यू कुत्रा चावून रेबिजमुळे होतो. कुठलाही कुत्रा चावल्यास लगेच जखम साफ करून घ्यावी. आणि डॉक्टरांकडे धाव घ्यावी.

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे दरवर्षी जगभरात रेबिजमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी ३६ टक्के मृत्यूचे प्रमाण भारतात आहे. दुसरं दुर्दैव म्हणजे कुत्रा चावण्याची प्रकरणं लहान मुलांच्या बाबतित जास्त असल्याचेही पुढे आले आहे.

अलीकडेच वाघ बकरीचे चहाचे मालक पराग देसाईंचा कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची चर्चा होती. मात्र त्यांचा मृत्यू कुत्रा चावल्याने नाही तर कुत्र्याच्या हल्ल्यामुळे ते खाली पडले आणि ब्रेम हॅमरेजमुळे त्यांचा मृत्यू झाला. याआधी गाझियाबादच्या एका १४ वर्षीय मुलाचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाला.

आज आपण डॉग बाइटनंतर काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊया

तुम्ही जखम जास्त गंभीर वाटत नसली तरी जखमेतून इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. हे तुमच्या जिवासाठीसुद्धा घातक ठरू शकते. तेव्हा कुत्रा चावल्यानंतर लगेच जखम साबणाने किंवा पाण्याने धुवून घ्या. पाच मिनिटानंतर कोमट पाण्याखाली जखमेचा भाग ठेवा. आणि नंतर जखम कोरडी करा.(Tips to Prevent Rabies)

  1. फार रक्त बाहेर पडत असेल तर कपड्याने तो भाग दाबून घ्या. जेणेकरून रक्त निघणे बंद होईल.

  2. जखमेवर अँटीसेप्टिक सोल्यूशन जसे की डेटॉल किंवा सेवलॉन लावून नीट स्वच्छ करून घ्या.

  3. आता जखम स्वच्छ बँडेजने बांधून घ्या.

  4. आता डॉक्टरांकडे जा आणि योग्य उपचार घ्या.

  5. डॉक्टर तुम्हाला टीटॅनस किंवा रेबीज व्हॅक्सिन देतील. रॅबिजचे सगळे डोज घेणे विसरू नका.

  6. कुत्र्या चावल्याने होणाऱ्या जखमेतून बहुतेकदा पस निघण्याची भिती असते. तेव्हा जखम नीट स्वच्छ करा.

  7. जखम खोलवर असेल तर दिवसातून दोनदा ड्रेसिंग करा.

या परिस्थितीत जास्त काळजी घ्या

  • जखम जास्त खोल असेल तर

  • जर व्यक्तिस मधुमेह किंवा कँसर किंवा एड्स असेल तर

  • १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ रक्त थांबत नसेल तर

  • मागल्या पाच वर्षात तुम्ही टीटॅनस व्हॅक्सिन घेतली नसेल तर

  • तुम्हाला फिरस्ती कुत्रा चावला असेल तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT