Aadhaar PAN google
लाइफस्टाइल

Aadhaar PAN : एखादी व्यक्ती वारल्यानंतर तिच्या पॅन आणि आधार कार्डचे काय कराल ?

मृत व्‍यक्‍तीचा कोणताही कर परतावा यायचा बाकी असेल तर तो बँक खात्यात जमा होईपर्यंत वाट पाहावी.

नमिता धुरी

मुंबई : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे आता भारतात अनिवार्य दस्तऐवज मानले जात आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, एखाद्याच्या मृत्यूनंतरही या कागदपत्रांशी संबंधित अनेक औपचारिकता जोडलेल्या असतात.

जर तुम्ही मृत व्यक्तीच्या आधार कार्ड आणि पॅनकार्डशी संबंधित औपचारिकता पूर्ण केली नाही तर तुम्हाला नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

पॅन कार्ड

पॅन कार्डशी संबंधित अनेक गोष्टी आहेत जसे की बँक खाते, आयटीआर इत्यादी. त्यामुळे अशी सर्व खाती पूर्णपणे बंद होईपर्यंत मृत व्यक्तीचे पॅनकार्ड जपून ठेवावे.

मृत व्‍यक्‍तीचा कोणताही कर परतावा यायचा बाकी असेल तर तो बँक खात्यात जमा होईपर्यंत वाट पाहावी.

कायदेशीर वारस सर्व खाती बंद केल्यानंतर आणि प्राप्तिकर रिटर्नचा व्यवहार केल्यानंतर मृत व्यक्तीचे पॅन कार्ड आयटी विभागाकडे सुपूर्द करू शकतो.

आयकर रिटर्न भरण्यापासून ते आयकर विभागाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच तुम्ही आयटी विभागाकडे पॅन जमा करू शकता.

जर पॅन सरेंडर करायचे असेल, तर मृताच्या कायदेशीर वारसाला अधिकृत मूल्यांकन अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागेल. या अर्जात कायदेशीर वारसाला पॅनकार्ड सरेंडर करण्याचे कारणही लिहावे लागेल.

पॅन कार्ड सरेंडर करणे अनिवार्य नाही. परंतु मृत व्यक्तीशी संबंधित पॅनकार्ड माहितीचा कोणीही गैरवापर करू नये म्हणून तुम्ही ते जमा करणे चांगले.

आधार कार्डशी संबंधित प्रक्रिया

आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार निष्क्रिय करण्याची कोणतीही तरतूद नाही. इतर कोणत्याही व्यक्तीने आधारचा गैरवापर करू नये यासाठी, तुम्ही ते मृत्यू प्रमाणपत्राशी जोडले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT