Makar Sankranti 2024 : सध्या सर्वत्र मकर संक्रांतीची धामधूम पहायला मिळत आहे. उद्या (सोमवारी)मकर संक्रांतीचा सण देशभरात साजरा केला जाणार आहे. मार्केटमध्ये तर मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची नुसती लगबग पहायला मिळत आहे. तिळाचे लाडू, पतंग, हलव्याचे दागिने इत्यादी गोष्टींनी बाजारपेठा फुलल्या आहेत.
भारतातील विविध राज्यांमध्ये मकर संक्रांती साजरी केली जाते. परंतु, काही राज्यांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आणि प्रथा आहेत. त्या दिवशी बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये ही भिन्नता दिसून येते. महाराष्ट्रात मकर संक्रांत, तामिळनाडूमध्ये पोंगल आणि गुजरातमध्ये उत्तरायण अशा विविध नावांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाचे आणि दानाचे खास असे महत्व आहे. शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी विशिष्ट रंगाचे कपडे घालणे देखील शुभ मानले जाते. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
हिंदू धर्मामध्ये लाल रंगाला अतिशय शुभ मानले जाते. लाल रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते, असे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही लाल रंगाची साडी किंवा लाल रंगाचा ड्रेस नक्कीच परिधान करू शकता. संक्रांतीला लाल रंगाचे कपडे परिधान केल्याने घरात सूख-शांती आणि समृद्धी येते अशी देखील मान्यता आहे.
केशरी रंग हा हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी केशरी रंगाचे वस्त्र परिधान केल्याने सूर्यदेवतेचा आशिर्वाद मिळतो, असे ही मानले जाते. यंदा मकर संक्रांतीला तुम्ही केशरी रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करू शकता.
पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि बृहस्पती देवगुरूला अतिशय प्रिय आहे. भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते. शास्त्रानुसार गुरू ग्रह हा अध्यात्म आणि धर्मासाठी कारक आहे. त्यामुळे, मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. यामुळे, भगवान विष्णूंचा आशिर्वाद आपल्याला लाभतो, असे देखील मानले जाते.
हिरव्या रंगाला समृद्धीचे प्रतिक मानले जाते. हिरवा रंग गणपती बाप्पाला देखील विशेष प्रिय आहे. हिरवा रंग धारण केल्याने गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर सदैव राहते, अशी देखील मान्यता आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्यावर तुम्हाला गणपती बाप्पांचा आशिर्वाद मिळेल, असे देखील मानले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.