अनेकांना नकोसा वाटणारा ऋतु म्हणजे उन्हाळा. फेब्रुवारी महिना संपत आला की उन्हाळ्याची चाहुल लागू लागते. या काळात वातावरणात उष्णता हळूहळू वाढत असल्यामुळे अनेक जण बेजार होतांना दिसतात. तर, काही जण या काळातही कूल म्हणजेच फॅशनेबल राहण्याचा प्रयत्न करत असतात. उन्हाळ्यात कितीही गरम होत असलं किंवा अन्य कोणतेही शारीरिक त्रास जाणवत असले तरीदेखील हा ऋतू नवनवीन फॅशन कॅरी करण्यासाठी परफेक्ट असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच या काळात अनेक जण नव्या फॅशनचे कपडे, सनग्लासेस किंवा छत्र्यांचे प्रकार ट्राय करताना दिसत असतात. विशेष म्हणजे तरुणाईमध्ये सध्या सनग्लासेसची विशेष क्रेझ असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच बाजारात वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे सनग्लासेस उपलब्ध आहेत. परंतु, बाजारात असे असंख्य सनग्लासेस पाहिल्यानंतर नेमका कोणता घ्यावा किंवा कोणता सनग्लास आपल्याला सूट होईल याविषयी काही जणांमध्ये द्विधा मनस्थिती असते. त्यामुळेच कोणत्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे कोणता सनग्लासेस आपल्याला सूट होईल किंवा साजेसा दिसेल ते पाहुयात.
अनेक जणांच्या चेहऱ्याची ठेवण ही गोलाकार असते. त्यामुळे अशा व्यक्ती कायम त्यांच्या हेअरस्टाइल किंवा चेहऱ्यात नवा बदल करतांना कन्फ्युज असताणत. या व्यक्ती सनग्लासेस घेतानादेखील फार विचार करतात. म्हणूनच, अशा व्यक्तींनी सनग्लासेस घेतांना कायम कॅटआय किंवा बटरफ्लाय या आकाराचेच सनग्लासेस निवडावेत. तसंच एविएटर्स शेपदेखील त्यांच्यावर खुलून दिसतो. परंतु, गोलाकार चेहरा असलेल्या व्यक्तींनी कधीही राऊंड फ्रेम किंवा बारीक फ्रेमची निवड करु नये.
२.अंडाकृती चेहरा -
अंडाकृती चेहरा म्हणजे ज्यात चेहरांची ठेवण उभी असते आणि हनुवटीचा आकार मात्र गोल असतो. त्याचसोबत गालदेखील फु
गीर असतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी कायम एविएटर किंवा रिफ्लेक्ट सनग्लासेस वापरावेत. तसंच अशा व्यक्तींनी अंडाकृती आकार असलेल्याच सनग्लासेसची निवड करावी. विशेष म्हणजे या व्यक्तींना खासकरुन बटरफ्लाय आकाराचे सनग्लासेस जास्त खुलून दिसतात.
३. चौकोनी चेहरा -
काही व्यक्तींच्या चेहऱ्याची ठेवणही चौकोनी असते. यात अनेकांच्या हनुवटीचा आकार मोठा असतो. तर कपाळ आणि जॉलाइन यांची उंची थोड्या फार प्रमाणात सारखीच असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी कायम मोठी फ्रेम असलेल्या सनग्लासेसची निवड करावी. यात चौकोनी, विविध रंगाचे किंवा वेगवेगळी प्रिंट असलेले, टिअरड्रॉप शेप, फ्रेमलेस, कॅटआय अशा वेगवेगळ्या आकाराच्या फ्रेम ट्राय कराव्यात. अशा व्यक्तींना या फ्रेम जास्त शोभून दिसतात.
हार्टशेप फेस असणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्याची लांबी जास्त असते. तसंच त्यांची हनुवटीदेखील निमुळती असते. त्यामुळे या व्यक्तींनी एविएटर्स, फ्रेमलेस, न्यूट्रल कलर आणि लहान फ्रेम असलेले सनग्लासेस ट्राय करावेत.
५. त्रिकोणाकृती चेहरा -
त्रिकोणाकृती चेहरा असलेल्या व्यक्तींनी शक्यतो गोलाकार, एविएटर्स, कॅटआय किंवा ट्रान्सपरंट फ्रेमची निवड करावी. तसंच अशा व्यक्तींनी कधीही मोठी फ्रेम किंवा चौकोनी फ्रेम निवडू नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.