White Hair - Amla Oil Treatment
White Hair - Amla Oil Treatment esakal
लाइफस्टाइल

White Hair Treatment: केस मुळापासून कायमचे काळे होतील, फक्त हा प्रभावी घरगुती उपाय करुन पहा

Lina Joshi

How to Make Amla Oil: आवळा एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-सी आणि टॅनिन नावाचे गुणधर्म आढळतात. आवळा प्राचीन काळापासून अनेक रोगांसाठी आणि केसांच्या निगा राखण्यासाठी वापरला जातो. याच आवळ्यापासून तुम्ही तुमच्या केसांसाठी एक रामबाण उपाय तयार करु शकतात.

आवळ्यामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे तुमचे केस मजबूत करतात, ज्यामुळे केसगळतीपासून सुटका मिळते. याशिवाय आवळा तुमच्या स्कॅल्पमधील मेलेनिन वाढवण्यास मदत करतो, ज्यामुळे तुम्ही केस पांढरे होण्याची समस्या टाळता, चला तर मग जाणून घेऊया केसांसाठी आवळा हेअर ऑइल (How To Make Amla Hair Oil)

वाढत्या वयानुसार आपले केस पांढरे होऊ लागतात. खरंतर केस पांढरे होण्यामागील कारण म्हणजे शरीरामध्ये मेलॅनिन रंगद्रव्याची कमतरता. शरीरात असणाऱ्या मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्याच्या प्रमाणावर आपल्या केसांचा आणि त्वचेचा नैसर्गिक रंग अवलंबून असतो. जेव्हा शरीरात मेलॅनिनची कमतरता निर्माण होते, त्यावेळेस केस पांढरे होऊ लागतात.

वृद्धत्वामुळे शरीरामध्ये मेलॅनिनची पातळी कमी होणे स्वाभाविक आहे. पण याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळेही या रंगद्रव्याची पातळी घटू शकते. जर तुमचे केस अनुवांशिक कारणांमुळे पांढरे झाले असल्यास ते नैसर्गिक स्वरुपात पुन्हा काळे होऊ शकत नाहीत. पण शरीरातील पोषक घटकांच्या अभावामुळे केस पांढरे झाले असतील तर आहारामध्ये योग्य ते बदल करुन ही समस्या दूर केली जाऊ शकते. त्यासाठी तज्ज्ञमंडळींचा सल्ला घेणे गरजेचं आहे.

अनुवांशिक कारणांमुळे केस पांढरे झाल्यास काय करावे?

आपल्या केसांचा रंग मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. वयाच्या ३० वर्षांनंतर शरीरातील मेलॅनिनचा स्तर कमी होऊ लागतो. तसंच केस पांढरे होणे ही समस्या व्यक्तीच्या जीवनशैलीमुळेही उद्भवू शकते. तसंच जर तुमच्या आई वडिलांनीही लहान वयातच केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना केला असेल तर तुमचेही केस कमी वयातच पांढरे होऊ शकतात. अनुवांशिक कारणांमुळे पांढरे होणारे केस नैसर्गिक स्वरुपात पुन्हा काळे होऊ शकत नाहीत.

​पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे केस होऊ शकतात पांढरे

केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणं आवश्यक आहे. शरीरात व्हिटॅमिन बी १२, फॉलेट, कॉपर आणि लोह यासारख्या पोषण तत्त्वांच्या कमतरतेमुळे लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात. नियमित पौष्टिक आहाराचे सेवन केल्यास शरीराला पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. ज्यामुळे केसांना पुन्हा नैसर्गिक रंग मिळू शकतो.

आरोग्याच्या समस्या असल्यास केस होतात पांढरे

थायरॉइड किंवा अ‍ॅलोपेसिया अ‍ॅरिएटा यासह आरोग्याच्या अन्य समस्यांमुळेही केस पांढरे होऊ शकतात. याव्यतिरिक्त शरीरातील हार्मोनची पातळी असंतुलित झाल्यासही केसांचा रंग बदलतो. शारीरिक आजारांवर योग्य वेळेतच औषधोपचार करणं आवश्यक आहे.

आवळा हेअर ऑइल बनवण्यासाठी आवश्यक साहित्य:

  • आवळा १०-१५

  • गरजेनुसार खोबरेल तेल

आवळा केसांचे तेल कसे बनवायचे? (how to make amla hair oil at home)

  • आवळा हेअर ऑइल बनवण्यासाठी सर्वप्रथम 10-15 आवळा घ्या.

  • नंतर सर्व आवळे उन्हात ठेवून वाळवा.

  • यानंतर ते आवळे मिक्सरच्या भांड्यात बारीक करुन गुळगुळीत पावडर बनवा.

  • नंतर एका लोखंडी कढईत आवळा पावडर टाका.

  • यानंतर साधारण ३-५ मिनिटे गॅसवर भाजून घ्या.

  • नंतर त्यात खोबरेल तेल टाकून मिक्स करा.

  • यानंतर थोडा वेळ शिजवून गॅस बंद करा.

  • नंतर तयार तेल थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवा.

  • यानंतर तेल थंड झाल्यावर बाटलीत भरुन साठवा.

  • मग ही बाटली किमान १५ दिवस उन्हात ठेवा.

  • यानंतर चाळणीच्या साहाय्याने तेल गाळून घ्या.

आवळा हेअर ऑइल कसे वापरावे? (How to Use Amla Hair Oil)

  • आवळा हेअर ऑइल केसांच्या टाळूवर नीट लावा.

  • त्यानंतर अर्धा ते एक तास केस असेच असूदेत.

  • यानंतर, शैम्पूच्या मदतीने आपले केस धुवा.

  • सर्वोत्तम परिणामांसाठी, हे तेल आठवड्यातून २-३ वेळा वापरा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT