white look increased your fashion trend and style in kolhapur 
लाइफस्टाइल

व्‍हाइट शर्टसह ज्वेलरीसाठी खास टीप्स; बॉलीवुड अभिनेत्रींसारखा दिसेल लुक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : वातावरण बदलेले तसे लोकांचे ठेवणीतले कपड्यांचे कलेक्शनही बदलते. गरमीमध्ये साधारणत: लोक हलकी आणि आरामदायक कपडे वापरणे पसंत करतात. परंतु कोणत्याही हंगामात फॅशन सोबत कॉम्प्रमाईज करायला कोणीही तयार नसते. साधारणत: महिला यामध्ये आघाडीवर असतात. स्वतःला त्या स्टाईलमध्ये आणि कम्फर्टमध्ये शोधण्यास व्यस्त असतात. 

जेव्हा ही फॅशन उन्हाळ्यातील दिवसांमध्ये येते तेव्हा वॉर्डरोबमधील पहिली पसंती ही वाईट शर्टला दिली जाते. गरमीमध्ये व्हाईट शर्ट आराम देतो. तसेच यामध्ये अनेक प्रकारचे स्टाईल करून फॅशनचा नवा लुक करता येतो. खास करून इयररिंग्स आणि डिझाईनचे नेकलेस यामुळे व्हाईट लुकला लोक पसंती देतात आणि तो उत्तमही दिसतो. 

व्हाईट शर्ट सोबत तुम्ही चोकर नेकलेस घालू शकता

साधारणतः बॉलीवुड इंडस्ट्रीमधील एक्ट्रेस शक्यतो व्हाईट शर्टला पसंती दर्शवतात. अभिनेत्री सोनम कपूर व्हाईट शर्ट सोबत सिल्वर चोकरला पसंती देते. व्हाईटसोबत सूट होईल असा एक्स मिनी स्कार्फ गळ्याभोवती गुंडाळलेला असतो. जर तुमच्या जवळही असा मिनी साइज स्कार्फ आणि व्हाईट शर्ट असेल तर तुम्ही ही पद्धत वापरून अभिनेत्री सोनम कपूरची स्टाईल करू शकता.

अभिनेत्री काजोल यांचा व्हाईट शर्टचा लूक

बऱ्याच फोटोमध्ये अभिनेत्री काजोल यांनी व्हाईट शर्ट सोबत ब्लॅक पेन्सिल कट घातला आहे. याला सूट होईल अशी एक नाजूक गोल्डन नेकलेस त्यांनी गळ्यामध्ये घातला आहे. अशा पद्धतीने तुम्ही व्हाईट शर्ट तुमच्या अंदाजाप्रमाणे स्टाईलमध्ये कम्फर्ट करून घेऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे या लुकसाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागत नाही

हीट व्हाईट शर्टची स्टाईल कशी करावी 

जर तुमच्याजवळ बेसिक व्हाइट शर्ट असेल तर त्याचं उत्तम फिटिंग हे तुमचे सौंदर्य वाढविण्यास मदत करतात. शर्टचा कॉलर पूर्णपणे बंद करून तुम्हीही कॉलरचा व्ही शेपमधील एक नेकलेस यावर घालू शकता. हा कॉलरच्या शर्टला हायलाईट करतो आणि तुमचा लुक उत्तम बनवतो.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Flight Cancellation:'तांत्रिक कारणामुळे गोव्यातून विमानाचे उड्डाण रद्द'; ५९ प्रवासी सोलापूर विमानतळावरून परतले; नाईट लॅंडिंग नसल्याने गैरसोय

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

SCROLL FOR NEXT