first kiss of the world  esakal
लाइफस्टाइल

Kiss Day 2025 :  जगातला पहिला Kiss कोणी घेतला होता? भारतातून झाली होती सुरवात

The World’s First Kiss: When, Where, and Who?: चुंबन भारतातून सुरू झाले आणि विदेशी आक्रमनांनंतर ते जगभर पसरले, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळ डिजिटल टीम

ओठांवरील चुंबन हे प्रेमाचे प्रतीक बनले. चुंबनातही फ्रेंच किस प्रसिद्ध आहे. त्यामूळे किसिंगची सुरूवात त्यांच्यापासूनच झाली की काय? असे वाटणे साहजिक आहे. पण,तसे नाही. काही संशोधकांचे असेही म्हणणे आहे की, चुंबन भारतातून सुरू झाले आणि विदेशी आक्रमनांनंतर ते जगभर पसरले, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कधी एखाद्या स्टेजवर अभिनेत्रीचे चुंबन घेण्यात आल्याने तर कधी ऑन स्क्रीन केलेल्या किसिंग सीनमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहे. याच किसची सुरूवात कधीपासून झाली याबद्दल मानववंशशास्त्रज्ञ वेगवेगळे सिद्धांत देतात. कदाचित जगातील पहिले चुंबन अपघातानेच झाले असावे, असा अंदाज वर्तविला जातो.

पण, सत्य असे आहे की, किसिंगची सुरूवात ही प्रेमाच्या नव्हे तर मायेच्या भावनेने झाली आहे. त्याच झालं असं की, आपल्या पुर्वजांनी म्हणजे माकडांनी याची सुरूवात केली. जेव्हा एक आई लहान माकडाला खायला घालायची. तेव्हा बाळाला खाऊ भरवण्याची पद्धतही वेगळी होती. त्यावेळी आई आधि स्वत: अन्न तोंडात घ्यायची आणि चावून अगदी बारीक करून ते अन्न तोंडानेच बाळाच्या तोंडात द्यायची.

याला ‘प्रीमॅस्टिकेशन फूड ट्रान्सफर’ असेही म्हणतात. आजही अनेक प्राणी बालकाला अशाच पद्धतीने खायला भरवतात. त्यातूनच किस करण्याची सुरूनात अश्मयुगीन काळात झाली असावी, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.केवळ खाद्य भरवतानाच नव्हे तर इतरवेळीही चिंपांझी माता आपल्या मुलांचे चुंबन घेतात. त्यामुळे चुंबन घेण्याचा व्यवहार आपण आपल्या पूर्वजांकडून शिकलो असण्याची शक्यता आहे.

आणखी एक सिद्धांत देखील आहे, ज्यानुसार चुंबनाची सुरूवात अपघातामुळे झाली असल्याचे होते. टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या मानव वंशशास्त्र विभागाने यावर मोठा अभ्यास केला आणि असा दावा केला की, पुर्वीच्या काळात भेटल्यानंतर एकमेकांच्या शरिराचा वास घेतला जायचा. ते लोक तसे का करायचे याला काही शास्त्रिय कारण नाही. मात्र, असे एकमेकांचा वास घेत असतानाच अपघाताने ओठांना ओठांचा स्पर्श झाला असेल आणि मनुष्य जातीत चुंबन घेण्याची प्रथा सुरू झाली असावी असा दावा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party Protest : पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन; दिल्लीतील जंतरमंतरनंतर अभिजित दिपके यांचा महाराष्ट्रात पहिलाच एल्गार

White Line Controversy: घाटकोपरमधील अनेक सोसायटीत पांढऱ्या पट्ट्या, नवा व्हिडीओ समोर; मनसेनं दिला इशारा

Nashik ACB Raid : सटाणा तहसील कार्यालयातच खळबळ! कर्जमाफीच्या ७/१२ उताऱ्यासाठी १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी रंगेहात जाळ्यात; एसीबीची धडक कारवाई

मंजुळाच्या झपाट्यात अडकला केशव ? ओम भुतकरच्या भूमिकेचं होतंय कौतुक

Latest Marathi News Live Update : पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी

SCROLL FOR NEXT