लाइफस्टाइल

Parenting Tips : मुलं शाळेत जायला नकार देतायत? मग या टिप्स फॉलो करा, मुलांना लागेल शाळेत जाण्याची गोडी

तुमचं मुलं देखील शाळेत जाण्यास नकार देतं? मग या टिप्स फॉलो करा

Aishwarya Musale

शाळेत जायला जवळपास सर्व मुलांना आवडते. अनेक मुले सकाळपासूनच शाळेत जाण्यासाठी उत्सुक असतात. मुलांना शाळेतील अॅक्टिव्हिटी, मित्र-मैत्रिणी, नवीन गोष्टी शिकणे आणि आव्हाने स्वीकारणे आवडते. मात्र काही मुलं अशी असतात ज्यांना शाळेत जाण्यास भीती वाटते. या मुलांसाठी शाळेत जाणे कधीकधी तणावाचे बनते. 

शाळेसाठी मुलांना लवकर उठवणे हे अनेक पालकांना जड जाते. कितीही प्रयत्न केला तरी मुलं उठत नाहीत. त्यांना अनेक प्रकारे उठवण्याचे प्रयत्न केले जातात.

रात्री वेळेत मुलं झोपलं नाही तर साहजिकच उठायला कुरकुर करतात. त्यामुळे तुम्हाला मुलगा वेळेत झोपण्यासाठी काही टिप्स वापराव्या लागतील. त्या वापरून शाळेत जाण्यासाठी तुम्ही त्याला लवकर उठवू शकाल.

1. खेळण्याचा क्लास लावा

मुलं थकत नसल्याने रात्री त्यांना लवकर झोप येत नाही. त्यामुळे त्यांना घराजवळ क्रिकेट, स्केटिंग, चेस अशाप्रकारच्या क्लासेसला पाठवा. त्यामुळे तुमचा मुलगा थकेल आणि त्याला लवकर झोप येईल. तसेच सकाळीही झोप पूर्ण झालेली असेल. त्यामुळे मुलगा सकाळी उठायला कुरकुर करणार नाही.

2. दुपारी झोपू देऊ नका

अनेक मुलं दुपारी झोपतात. तेव्हा त्यांची झोप पूर्ण होते. त्यामुळे साहजिकच रात्री लवकर झोप येत नाही. मग सगळं चक्र बिघडतं. म्हणूनच तुम्ही मुलाला दुपारी झोपू देऊ नका. म्हणजे तो रात्री लवकर झोपेल आणि सकाळी उठायला त्याला अडचण येणार नाही.

3. दिनचर्या ठरवा

मुलांची दिनचर्या ठरवणे खूप गरजेचे आहे. सुट्टीच्या काळातही ती बदलणार नाही याची काळजी घ्या. हे करणे आवश्यक आहे कारण मुलांना सवय लागली की मुले आपोआप वेळेवर उठतात. सुट्टीच्या दिवशी ही सवयी बदलली तर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या.

4. ८ तासांची झोप गरजेची 

मुलांसाठी ८ ते १० तासांची झोप खूप गरजेची आहे. तुम्ही मुलाला रात्री लवकर झोपवायचा प्रयत्न करा. म्हणजे त्याची झोप पूर्ण होईल. त्यामुळे सकाळी त्याला फ्रेश वाटेल.

5. अलार्म लावा

मुलांच्या खोलीत अलार्म लावा. सकाळी अलार्म लाऊन उठण्याची त्यांना सवय लावा. म्हणजेच अलार्म वाजल्यावर ते उठतील. आणि रात्रीही अलार्मच्या भितीने लवकर झोपतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT