ratan tata google
लाइफस्टाइल

कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असलेले रतन टाटा का राहिले अविवाहित ?

रतन टाटा आयुष्यात ४ वेळा प्रेमात पडले पण त्यांनी लग्न केले नाही.

नमिता धुरी

मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे केवळ त्यांच्या कर्तृत्वासाठी आणि कार्यासाठीच नव्हे तर त्यांच्या नम्र स्वभावासाठी आणि डाउन टू अर्थ व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखले जातात. टाटा समूहाला नव्या उंचीवर नेणारे रतन टाटा आज कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत.

त्यांच्या व्यावसायिक यशाबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, पण लव्ह लाईफची ओळख फार कमी लोकांना असेल. रतन टाटा आयुष्यात ४ वेळा प्रेमात पडले पण त्यांनी लग्न केले नाही.

असे म्हणतात की खरे प्रेम एकदाच होते आणि त्यानंतर अशी भावना मिळणे अशक्य आहे. रतन टाटा यांच्यासोबतही असेच काहीसे घडले होते, परंतु त्यांचे लग्न होऊ शकले नाही. टाटांनी आजतागायत लग्न केले नाही कारण ते त्यांच्या तरुण वयात ज्या मुलीवर प्रेम करत होते तिच्याशी ते लग्न करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी कधीही प्रेमाचा शोध घेतला नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य 'द टाटा ग्रुप'ला समर्पित केले.

एका मुलाखतीदरम्यान रतन टाटा यांनी स्वतः खुलासा केला की जेव्हा ते लॉस एंजेलिसमधील आर्किटेक्चर फर्ममध्ये काम करत होते, तेव्हा त्यांना एक मुलगी भेटली आणि ते तिच्या प्रेमात पडले.

त्यावेळी त्यांची जीवनशैली अतिशय स्थिर होती आणि त्यांनी लग्न करून सेटल होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतात सात वर्षांपासून आजारी असलेल्या आजीची काळजी घेण्यासाठी त्यांनी भारतात परतण्याचा कठीण निर्णय घेतला.

यानंतर रतन टाटा आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी परत गेले आणि तिला आपल्यासोबत भारतात घेऊन येण्याचा विचार करत होते, परंतु तसे झाले नाही. 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे, तिच्या पालकांना आपल्या मुलीला भारतात पाठवणे सोयीचे नव्हते. त्यामुळे त्यांचे नाते तुटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT