World Autism Awareness Day History, Significance And Theme: दरवर्षी 2 एप्रिलला जागतिक ऑटिझम जागरूकता दिन साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट ऑटिझमविषयी जागरूकता वाढवणे, समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आणि ऑटिस्टिक व्यक्तींना पाठिंबा देणे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) 2007 मध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी अधिकृतपणे मान्य केला.
संयुक्त राष्ट्रसंघाने 2007 मध्ये जागतिक ऑटिझम जागरूकता दिन साजरा करण्यासाठी अधिकृतपणे मान्यता दिली. त्यानंतर 2008 पासून हा दिवस जगभर साजरा होऊ लागला. ऑटिस्टिक व्यक्तींना समान संधी मिळाव्यात, त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव व्हावी आणि समाजाने त्यांच्याशी समजून वागावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. हा दिवस साजरा करून लोकांना ऑटिझम म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे आणि व्यवस्थापन कसे करावे याविषयी माहिती दिली जाते.
संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी जागतिक ऑटिझम जागरूकता दिन साजरा करण्यासाठी एक विशिष्ट्य थीम ठरवते आणि त्या थीमशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
यंदा संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक ऑटिझम जागरूकता दिन साजरा करण्यासाठी "अॅडव्हांसिंग न्यूरोडायव्हर्सिटी अँड दि यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स" म्हणजेच "न्यूरोविविधतेचा विकास आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे (SDGs)" अशी थीम ठेवली आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.