soil sakal
लाइफस्टाइल

Health Care News: तुम्हालाही माती खावीशी वाटते? हा आजार तर नाही ना? आताच जाणुन घ्या

पावसाचा एक थेंब पडला की मातीतून निघणारा सुगंध आल्यावर माती खावीशी वाटते.

Aishwarya Musale

लहान मुले अनेकदा माती, खडू किंवा स्लेटच्या पेन्सिल खाताना दिसतात. पण ही सवय फक्त लहान मुलांपुरती मर्यादित नाही तर मोठ्या लोकांनाही ही सवय असते. हे विशेषतः गर्भधारणेदरम्यान दिसून येते. पावसाचा एक थेंब पडला की मातीतून निघणारा गोड सुगंध आल्यावर माती खावीशी वाटते. असे का घडते? हे सामान्य आहे की काही रोगाचे लक्षण आहे? याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

माती खावीशी का वाटते?

माती खाण्याच्या या सवयीला वैद्यकीय भाषेत जिओफॅगिया म्हणतात. हे पिका नावाच्या खाण्याच्या विकाराशी संबंधित आहे. यामध्ये व्यक्तीला खाण्यास योग्य नसलेल्या गोष्टी खाण्याची तीव्र इच्छा जाणवते.

यामध्ये त्या व्यक्तीला माती खाण्याची ओढ जणू नशाच वाटते. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की माती खाण्याचा हा रोग स्त्रियांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो परंतु केवळ हे कारण पुरेसे नाही.

हा आजार लोहाच्या कमतरतेशी संबंधित आहे.डॉक्टर सांगतात की अनेकदा गरोदर महिलांना लोहाच्या कमतरतेचा त्रास होतो त्यामुळे त्यांना खडू, माती, राख खावेसे वाटते. मात्र, हे दीर्घकाळ केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. याने काय नुकसान होऊ शकते ते जाणून घेऊया.

माती खाल्ल्याने या समस्या उद्भवू शकतात

  • जेव्हा तुम्ही माती खातात तेव्हा तुमचे शरीर लोह शोषून घेण्यास असमर्थ असते. माती तुमच्या शरीराला पोटॅशियम आणि झिंक शोषण्यापासून रोखू शकते. यामुळे तुमच्यात खनिजांची कमतरता असू शकते.

  • मातीमध्ये जड धातू, ह्यूमन वेस्ट यासह अनेक हानिकारक पदार्थ असतात, ज्यामुळे तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका असतो.

  • पोटात जंत होण्याची तक्रार असू शकते. पचनाशी संबंधित समस्या देखील असू शकतात.

  • जास्त माती खाल्ल्याने पोटात स्टोन होण्याची शक्यता वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT