Doctors Day 2022 esakal
लाइफस्टाइल

भारतात Doctors Day 1 जुलैला का साजरा करतात माहितीय? जाणून घ्या कारण

सकाळ डिजिटल टीम

कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरच आघाडीवर होते.

१ जुलै हा दिवस समाजातील डॉक्टर बांधवांच्या अतुल्य योगदानाबद्दल, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी हा दिवस संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. डॉक्टरांचं आपल्या आयुष्यातील योगदान किती महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला वेगळ्यापध्दतीनं सांगायला नको.

गेल्या २ वर्षांपासून आपण कोरोनाशी लढा देत आहोत. या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरच आघाडीवर होते. आज आपण भारतातील डॉक्टर दिवसाविषयी (Doctor's Day) सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. केंद्र सरकारनं १९९१ ला डॉक्टर दिनाची घोषणा केली. भारतात १ जुलै रोजी डॉक्टर दिन साजरा केला जातो, तर अमेरिकेत (America) ३० मार्च, क्यूबामध्ये ३ डिसेंबर आणि इराणमध्ये २३ ऑगस्ट हा डॉक्टर दिन असतो. यावरून हे लक्षात येतं की, वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या तारखेला डॉक्टर दिन साजरा केला जातो.

डॉ. बिधान चंद्र रॉय कोण आहेत?

बिधान चंद्र रॉय (Dr. Bidhan Chandra Roy) यांचा जन्म १ जुलै १८८२ ला बिहारमध्ये झाला होता. डॉक्टर होण्याचा त्यांचा ध्यास हा अचंबित करणारा होता. गणितातील पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी कलकत्ता विद्यापीठात औषधांसंदर्भातील शिक्षण घेतले. पुढील औषधांसंदर्भातील उच्च शिक्षणाच्या महत्वाकांक्षेनं ते परदेशात गेले. लंडनमधील प्रतिष्ठित सेंट बार्थोलोमेझ हॉस्पिटलमध्ये त्यांना अभ्यास करायचा होता. परंतु, ते आशियाई खंडातील असल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारला गेला, तरीसुद्धा त्यांनी हार न मानता सतत ३० दिवस प्रयत्न केल्यामुळं त्यांना नंतर प्रवेश देण्यात आला. पुढे १९११ मध्ये त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर त्यांनी कलकत्ता वैद्यकीय महाविद्यालयात काम करणं सुरू केलं. त्यानंतर कॅम्पबेल वैद्यकीय महाविद्यालय आणि कार्मिशेल वैद्यकीय महाविद्यालयातही त्यांनी काम केले. ते प्रसिद्ध डॉक्टर आणि स्वातंत्र्यसेनानीही होते.

Dr. Bidhan Chandra Roy

राजकारणाच्या पटलावर देखील डॉ. बिधान चंद्र रॉय यांचं मोठं योगदान

सविनय कायदेभंगाच्या चळवळीत रॉय यांनी महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) पाठिंबा दिला होता. त्यानंतर पुढे ते काँग्रेस नेते आणि कालांतराने पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीही झाले. पुढे त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी ४ फेब्रुवारी १९६१ रोजी त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, म्हणजेच 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला. पुढं काही महिन्यांतच १ जुलै १९६२ ला डॉ. बिधान चंद्र रॉय यांचा मृत्यू झाला. भारतीय वैद्यकीय परिषदेनं त्यांच्या स्मरणार्थ डॉ. बी. सी. रॉय नॅशनल अवॉर्ड फंडची स्थापना केली. तर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येणारा डॉ. बी. सी. रॉय नॅशनल अवॉर्ड १९७६ पासून सुरू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT