JCB 
लाइफस्टाइल

JCB चा रंग पिवळाच का असतो माहित आहे?

या मशीनला एकच रंग का असतो?

शर्वरी जोशी

कोणत्याही इमारतीच्या कंस्ट्रक्शन साईटवर गेलात की तिथे मोठमोठे मशीन पाहायला मिळतात. यात खोदकामसाठी वापरण्यात येणारं जेसीबी (JCB) तर साऱ्यांनीच पाहिलं असेल. अवजड सामान उचण्यापासून मोठे खड्डे खणण्यापर्यंत जेसीबीचा वापर केला जातो. खरं तर या मशीनचं 'बॅकहो लोडर' असं नाव आहे. परंतु, आज प्रत्येक जण त्याला जेसीबी (JCB ) याच नावाने ओळखतो. जेसीबी हे मशीनचं नाव नसून कंपनीचं नाव आहे, हेदेखील फार कमी जणांना माहित आहे. आपण कायम बघतो की या जेसीबीचा (बॅकहो लोडर) रंग हा पिवळाच असतो. पण, हा एकच रंग या मशीनला का असतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न फारसा कोणी केला नसेल. म्हणूनच, जेसीबीचा रंग पिवळा (yellow) का असतो हे जाणून घेऊयात. (why-jcb-machine-is-yellow-in-colour)

का असतो जेसीबीचा रंग पिवळा?

JCB हे एका कंपनीचं नाव असून ही कंपनी अनेक अवजड मशीनची निर्मिती करते. हे मशीन खासकरुन कंस्ट्रक्शन साईटवर वापरली जातात. त्यातच बॅकहो लोडर हे कंपनीचं एक मशीन असून ते खोदकाम व अवजड वस्तू उचलण्यासाठी मदत करते. कंपनीने प्रथम तयार केलेल्या बॅकहो लोडरला निळा व लाल रंग दिला होता. परंतु, कालांतराने या रंगात बदल करुन तो पिवळा देण्यात आला. व्हिजिबिलिटीसाठी पिवळा रंग योग्य असल्यामुळे या मशीनच्या रंगात बदल करण्यात आला.

पिवळा रंग लांबून सहज दिसून येतो. त्यामुळे कंस्ट्रक्शन साईटवर काम सुरु असतांना अंधारात, धुक्यात किंवा धुळ, माती असतांना सुद्धा हे मशीन सहज दिसून येतं. म्हणूनच, या मशीनचा रंग बदलून पिवळा करण्यात आला. विशेष म्हणजे कंस्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या कामगारांचे हेल्मेटदेखील पिवळ्या रंगाचे असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

Alegaon Paga Murum Scam: आलेगाव पागा पाझर तलावातील कथित अवैध मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती? पर्यावरणप्रेमींची वरिष्ठ चौकशी व फेरपंचनाम्याची मागणी

Sillod Farmer: पीक कर्ज, पाण्याअभावी वाळलेले पीक; सिल्लोड तालुक्यात ३० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने जीवन संपवले

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

SCROLL FOR NEXT