Marathi Bhasha Din 2024 esakal
लाइफस्टाइल

Marathi Bhasha Din 2024 : कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशीच का साजरा केला जातो मराठी भाषा दिन?

Marathi Bhasha Din 2024 : दरवर्षी २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन’ हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Marathi Bhasha Din 2024 : दरवर्षी २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन’ हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि देशातील अनेक भागांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषिक आज देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात राहतात. त्यामुळे, हा दिवस जगाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो, असे म्हणायला काही हरकत नाही.

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू हा आहे की, मराठी भाषेचा गौरव करणे आणि मराठी भाषेतील साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन करणे.

आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण कवी कुसुमाग्रज यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच, त्यांच्या जयंतीच्या दिवशीच हा मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो? त्याबद्दल ही आपण जाणून घेऊयात.

कवी कुसुमाग्रज

मराठी साहित्यातील महान कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ मध्ये नाशिकमध्ये झाला होता. कुसुमाग्रज हे मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी, नाटककार, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक होते. विष्णू वामन शिरवाडकर यांना ‘कुसुमाग्रज’ या टोपणनावाने ओळखले जाते. त्यांनी स्वातंत्र्य, न्याय आणि वंचितांचे स्वातंत्र्य यावर विपुल लेखन केले आहे. भारतीय साहित्यातील उत्कृष्ट नमुना म्हणून कुसुमाग्रज यांचे साहित्य मानले जाते.

मराठी भाषेतील साहित्यासोबतच त्यांनी मराठी रंगभूमीसाठी देखील महत्वपूर्ण योगदान दिले आहे. १९९१ मध्ये त्यांना पद्मभूषणसह इतर अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आज ही त्यांच्या साहित्यकृती या वाचकांना विपुल ज्ञान आणि प्रेरणा देतात. १० मार्च १९९९ मध्ये कुसुमाग्रज यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी नाशिकमध्ये निधन झाले.

कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेसाठी मोठे योगदान दिले, त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि मराठी भाषेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी २०१३ पासून २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.

देशातील चौथ्या क्रमांकाची भाषा

मराठी ही भाषा महाराष्ट्राची राजभाषा आहे. २०११ मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेनुसार हिंदी, बंगाली, तेलुगूनंतर देशात सर्वात जास्त बोलली जाणारी मराठी ही चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी १९ व्या क्रमांकावर आहे. मराठी भाषेला समृद्ध परंपरा आणि वारसा आहे. हा वारसा आपण सर्वांनी असाच जपायला हवा. यासोबतच आपण सर्वांनी मराठी भाषेच्या संवर्धनाला आणि विकासाला प्राधान्य द्यायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : लालबाग राजाची मिरवणूक २२ तासांनी गिरगाव चौपाटीवर

Chh. Sambhajinagar: गणेश विसर्जनावेळी जीवघेणा प्रसंग; गणेश भक्ताला जीवनरक्षक दलाने दिले वेळेवर जीवनदान

मुंबईत गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात विसर्जन, अनंत अंबानीही उपस्थित

Village Road Dispute : पाणंद रस्त्यावरून होणाऱ्या वादावर प्रशासनाचे महत्वाचे पाऊल, रस्त्यांचे 'बारसं' घालून अतिक्रमण निघणार

SCROLL FOR NEXT