red ant bite reason 
लाइफस्टाइल

लाल मुंगी चावल्यावर दाह का होते?  कारण वाचून व्हाल थक्क

शर्वरी जोशी

सगळ्यात लहान किटक कोणता असा प्रश्न विचारला तर हमखास डोळ्यासमोर मुंगी येईल. दिसायला अत्यंत लहानशी असणारी ही मुंगी चावल्यावर मात्र, प्रचंड वेदना होतात. मुंग्यांमध्ये दोन प्रकार आहेत हे साऱ्यांनाच ठावूक असेल. एक काळी मुंगी आणि दुसरी लाल मुंगी. या दोन्ही मुंग्या चावतात. परंतु, लाल मुंगी चावल्यानंतर प्रचंड वेदना होतात. मुंगी चावल्यानंतर प्रभावित झालेला भाग लाल होतो आणि तेथे सतत दाह निर्माण होतो. यात अनेकदा मुंगी का चावते? किंवा मुंगी नेमकी कशी चावते ?हा प्रश्न अनेकांना पडतो. यात काहींच्या मते, स्वत: चं रक्षण करण्यासाठी मुंगी चावते असं म्हटलं जातं. मात्र, मुंगी चावण्याचं खरं कारण अत्यंत निराळं आहे. त्यामुळेच मुंगी किंवा मोठे काळे मुंगळे का चावतात ते जाणून घेऊयात.

साधारणपणे कोरड्या किंवा दाराच्या, खिडक्यांच्या फटीमध्ये मुंग्या त्यांचं वास्तव्य निर्माण करत असतात. या मुंग्या एकट्या न राहता, एक जुटीने राहतात. त्यामुळे अनेकदा आपला स्पर्श झाल्यावर त्या कडाडून चावतात. पण, या मुंग्या चावल्यावर प्रभावित जागेवर दाह का होते हे पाहुयात.

मुंग्यांच्या पोटाजवळ एक नांगी असते. या नांगीजवळ फॉर्मिक अॅसिडच्या ग्रंथी असतात. ज्यावेळी मुंगी आपल्याला चावते, त्यावेळी ती तिचं तोंड उघडते आणि आपल्या त्वचेमध्ये खोलपर्यंत त्याचा दंश करते. मुंगी दंश करत असताना तिच्या नांगीतील फॉर्मिक अॅसिड आपल्या त्वचेवर पडतं. यात मुंगीचा दंश आणि हे अॅसिड पडणे या दोन्ही क्रिया एकाच वेळी होतात. त्यामुळे मुंगी चावल्यावर प्रभावित जागेवर प्रचंड दाह निर्माण होते.

दरम्यान, लाल मुंगीप्रमाणेच काळी मुंगीदेखील चावते. मात्र, तिच्या नांगीमध्ये असलेले फॉर्मिक अॅसिडची दाहकता लाल मुंगीच्या फॉर्मिक अॅसिडच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे काळी मुंगी चावल्यानंतर त्याचा परिणाम फारसा जाणवत नाही.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT