pregnancy file photo
लाइफस्टाइल

गरोदरपणात स्त्रियांना डोहाळे का लागतात माहित आहे?

अनेक स्त्रियांनी गरोदरपणात चटपटीत पदार्थ किंवा माती, खडू असे पदार्थ खावेसे वाटतात.

शर्वरी जोशी

आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असतो. एखादी स्त्री आई होणार समजल्यावर घरातलं वातावरण अगदी बदलून जातं. सगळीकडे आनंद, उत्साहाचं वातावरण असतं. घरातील प्रत्येक सदस्य गरोदर स्त्रीच्या दिमतीला तयार असतो. तिला काय हवं नको याची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यातच जर स्त्रीला डोहाळे लागले असतील तर विचारायलाच नको. रात्री अपरात्रीदेखील स्त्रियांना कोणताही ठराविक पदार्थ खाण्याची इच्छा होते. परंतु, हे डोहाळे नेमके का लागतात किंवा डोहाळे म्हणजे नेमकं काय ते आज जाणून घेऊयात.

साधारणपणे अनेक स्त्रियांनी गरोदरपणात चटपटीत पदार्थ किंवा माती, खडू असे पदार्थ खावेसे वाटतात. त्यामुळे कदाचित बाळाला किंवा आईला हे पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल असा एक सर्व सामान्य समज आहे. परंतु, प्रत्यक्षात डोहाळे लागण्यामागे एक कारण आहे. ठराविक पदार्थ खाण्याची इच्छा होणे म्हणजे शरीरात एखाद्या घटकाची कमतरता असणे असं या मागचं खरं कारण आहे.

हेही वाचा : सावधान! आठ पदार्थांमुळे कोरोनाचा धोका; इम्युनिटीवर करतात परिणाम

गरोदरपणात स्त्रियांच्या हार्मोन्समध्ये बदल होत असतो. त्यामुळे शरीरातील या हार्मोनल बदलामुळे स्त्रियांना डोहाळे लागतात. त्यातच शरीरात एखादा विशिष्ट पोषकद्रव्य कमी झाल्यासदेखील स्त्रियांना ते पदार्थ खावेसे वाटतात.उदा. स्त्रियांना माती किंवा खडू खावासा वाटात असेल तर, त्या स्त्रीमध्ये कॅल्शिअमची कमतरता आहे असं दिसून येतं.

विशेष म्हणजे, प्रत्येक प्रांत आणि ठिकाणानुसार, स्त्रियांचे डोहाळे वेगवेगळे असतात. भारतीय स्त्रियांना आंबट, गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. तर, जपान, द. कोरिया या सारख्या ठिकाणच्या स्त्रियांना भातापासून तयार केलेले पदार्थ खावेसे वाटतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Toll Rule India : वाहनचालकांसाठी खुशखबर ! महामार्गावर टोल नियमात मोठा बदल, खर्च होणार कमी; काय आहे सरकारचा प्लॅन?

कमळी शोधणार सरोजच्या मृत्यूचं सत्य ते जय वाचवणार शरूचा जीव; या आठवड्यात तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये काय घडणार?

Latest Marathi News Live Update : जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित बनावट सहीप्रकरणी मोठी कारवाई; चामोर्शी नगरसेवकाला ५ दिवसांची पोलीस कोठडी

दारूवर तुमचा खर्च, सरकारची मात्र हजारो कोटींची कमाई! अवघ्या 2 महिन्यांत या राज्याने कमावले 10,500 कोटी; महाराष्ट्राचा आकडा किती?

Sachin Ahir: सचिन अहिरांचा उपसभापतीपदासाठी अर्ज; ठाकरे गटाला धक्का, शिंदेसेनेत जाणार, मुंबईच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT