Phone  Sakal
लाइफस्टाइल

सकाळी उठल्यावर मोबाईल वापरत असाल तर सावधान! होऊ शकतात गंभीर आजार

प्रत्येक सकाळ आपल्यासोबत एक नवी ऊर्जा घेऊन येते

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक सकाळ आपल्यासोबत एक नवी ऊर्जा घेऊन येते. सकाळी उठल्यावरचा पहिला तास तुम्हाला दिवसभर ऊर्जा देतो. अनेक जण सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरायला सुरुवात करतात. तुम्हीही असे करत असाल तर ते अनेक आजारांना आमंत्रण देत आहे.

तज्ञांनी दिवसाच्या पहिल्या तासात मेसेज वाचण्यास आणि मोबाईल फोन ऑपरेट करण्यास मनाई देखील केली आहे. असे का होते? सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरण्यास मनाई का आहे? यामागचे कारण आज जाणून घेऊया.

हेही वाचा : कंपन्यांचे मुल्यांकन लक्षात घेऊन केलेली गुंतवणूक ठरेल फायदेशीर

तणाव वाढतो :

सकाळी कोर्टिसोल हार्मोनची पातळी कमी होते. कॉर्टिसोल हा तणाव संप्रेरक आहे. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटते. पण, सकाळी उठल्याबरोबर मोबाईल दिसला तर त्याच्यासोबत अनावश्यक ताण येतो. हे शरीर आणि मेंदूच्या प्रक्रियांमध्ये मोबाईलचा अडथळा येतो.

डोके आणि मान दुखणे :

सकळी उठल्या उठल्या मोबाईलचा भरपूर वापर होतो आणि त्याच स्थितीत बराच वेळ बसून काम करतात. त्यामुळे डोके आणि मान दुखण्याची शक्यता वाढते. 20 ते 40 वयोगटातील व्यावसायिक लोकांमध्ये मणक्याशी संबंधित समस्या अधिक दिसून येत आहे.

दीर्घकाळ मोबाईल वापरल्याने मणक्यावर दबाव येतो. यामुळे तुमच्या लिगामेंटवर त्याचा परिणाम होतो. अशा परिस्थितीत, स्नायू आणि डिस्कच्या समस्यांचा धोका वाढतो. असे बरेच लोक आहेत ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे, परंतु त्यांना मणक्याच्या समस्या आहेत.

या उपायांचे पालन करा :

  • मोबाईल बेडरूमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करा.

  • नाश्त्याच्या टेबलावर मोबाईल अजिबात वापरू नका.

  • रात्री फोनचे इंटरनेट बंद करून झोपा.

  • सकाळी सर्वप्रथम इंटरनेट उघडणे टाळा. दिवसाच्या पहिल्या तासात ते चालू न ठेवण्याचा प्रयत्न करा.

  • तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांनाही समजावून सांगा की, सकाळी कोणताही महत्त्वाचा संदेश पाठवू नका.

  • या नियमांचे काटेकोरपणे पालन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT