Winter Dishwashing Tips Esakal
लाइफस्टाइल

Winter Dishwashing Tips: थंडीत भांडी घासण्याचा प्रचंड कंटाळा येतो? मग वापरा या ट्रिक्स

महाराष्ट्रात आता थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Winter Tips: महाराष्ट्रात आता थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री चांगलीच कडाक्याची थंडी पडू लागली आहे. अशा दिवसांत महिलांना थंड पाण्याशी संबंधित काम करण्याचा प्रचंड कंटाळा येतो.  त्यामुळे थंड पाण्यात हात घालणं आणि त्याच्याशी संबंधित कुठलंही काम करणं टाळण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यापैकी काही कामं टाळणं शक्यही असतं. मात्र अशी काही कामं असतात, जी घरातील महिलेला दररोज करावीच लागतात. भांडी घासणं हे त्यापैकीच एक काम आहे.

रोजच्या जेवणानंतर भांडी घासण्याचा थंडीच्या काळात त्रास होतो. थंड पाण्यात हात घालू नये, असं वाटतं. या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात. आजच्या लेखात आपण अशा काही ट्रिक्स पाहणार आहोत ज्याचा वापर केल्यास हिवाळ्यात थंड पाण्याने भांडी धुताना होणारा त्रास सहज कमी होऊ शकतो चला तर मग बघू कोणत्या आहेत त्या ट्रिक्स...

1) थंडीच्या काळात भांडी घासण्यासाठी हातमोज्यांचा म्हणजेच ग्लब्सचा वापर केल्यामुळे बरेच फायदे होतात. त्यामुळे थंड पाण्याचा थेट तुमच्या हाताच्या त्वचेशी संपर्क होत नाही. 

2) भांडी घासायला सुरुवात करण्यापूर्वी हातात मोजे घाला. त्याचप्रमाणे दिवसभराची भांडी साठवून न ठेवता, त्या त्या वेळी पडलेली भांडी लगेच घासून ठेवायला सुरुवात करा. त्यामुळेही थंड पाण्याचा त्रास कमी होईल.

3) भांडी धुवायला घेण्यापूर्वी सर्व भांड्यांमध्ये गरम पाणी ओता. काही वेळ हे पाणी तसंच ठेवा. त्यानंतर भांडी घासताना ती तुलनेने पटापट साफ होत असल्याचा अनुभव तुम्हाला येईल. 

4) करपलेली भांडी धुणं, हे सर्वात मोठं आव्हान असतं. बराच वेळ ही भांडी घासावी लागतात. अशी भांडी धुताना स्क्रब पँडवर मीठ आणि डिश वॉश लावून भांडी घासायला सुरुवात करा. त्यामुळे कमी कष्टात भांडी साफ होऊ लागतील. तुमचा वेळ आणि ऊर्जा या दोन्हीची बचत होऊ शकेल. 

5) जेवनानंतर आपण आपल्या ताटातील उरलेले अन्न कचरा पेटीत टाकायला सवय घरातील प्रत्येक सदस्याला लावा त्यामुळे तुम्हाला भांडे घासायला सोपे जाऊ शकतील.

6) थंडीच्या काळात कमी कष्टात आणि कमी वेळेत भांडी चमकवण्यासाठी काही घरगुती उपायांची मदत घेता येऊ शकते. त्यासाठी तुमच्या बेसिनमधील पाणी भरा आणि ते अडवून ठेवा. ते वाहून जाऊ देऊ नका. त्यात दोन चमचे बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि एक चमचा हायड्रोजन पॅरॉक्साईड घाला. 15 मिनिटं बेसीनमधील पाणी तसेच राहू द्या. त्यानंतर हे पाणी सोडून द्या आणि भांडी घासायला सुरुवात करा. भांडी तुलनेने लवकर साफ होतील आणि चमकू लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT