Shrug Design
Shrug Design  Esakal
लाइफस्टाइल

Winter Fashion : हिवाळ्यातही दिसा स्टायलिश; श्रगचे हे बेस्ट ऑप्शन एकदा ट्राय कराच!

सकाळ डिजिटल टीम

हिवाळा इतका वाढलाय की स्वेटर घळण्याशिवाय पर्याय नाही. हिवाळ्यात थंडी आवडती असली तरी चहा आणि स्वेटरवर अवलंबून राहणे चुकीचेच आहे. कारण स्वेटर थंडी घालवत असले तरी सतत ते घालून बसणं अवघडल्यासारखं होतं.  तरीही काही पर्याय नसल्याने स्वेटर घालावेच लागते.

प्रत्येक स्त्रीच्या वॉर्डरोबमध्ये कॉटनचे कपडे, सूट, कुर्ते इत्यादी आरामदायक असतात. तरीही अनेक महिला स्टायलिश आणि कंफरटेबल कपड्यांच्या शोधात असतात. जर तुम्हीही असा आउटफिट शोधत असाल तर तुम्ही तुमच्या आउटफिटमध्ये श्रगचा समावेश केलाच पाहिजे. कारण, सध्याची लेटेस्ट फॅशन आहे ती. जी कोणीही करू शकते. अगदी पुरूषांसाठीही टिशर्टवर श्रगची स्टाईल आहे.

शॉर्ट श्रग

शॉर्ट श्रग्समध्ये तुम्हाला प्रिंटेड टू प्लेन श्रग्स सहज मिळतील. शॉर्ट श्रग निवडण्याचा फायदा असा होईल की तुम्ही प्रत्येक वेस्टर्न ड्रेसवर ते घालू शकता. तुम्हाला लाँग कुर्तीमध्ये आकर्षक दिसायचे असेल तर श्रग हे काम सोपे करते.

डिझायनर स्लीव्ह श्रग

जर तुम्हाला श्रगमधील व्हरायटी जाणून घ्यायची असेल तर मार्केटमध्ये डिझायनर स्लीव्ह डिझाइन्स उपलब्ध आहेत. तुम्हाला अनेक प्रकारचे डिझाईन्स सहज मिळतील जसे- जर तुम्हाला हाफ स्लीव्ह्ज घालण्याचा शौक असेल, तर तुम्ही श्रगमध्ये हाफ स्लीव्हजचे डिझाइन निवडू शकता.

प्रिंटेड श्रग

तुम्ही प्रिंटेड श्रग प्लेनऐवजी वेगळ्या पद्धतीनेही घालू शकता. कारण आजकाल प्रिंटेड श्रग विथ सिंपल श्रग स्टाइल करण्याचा ट्रेंड आला आहे.

लाँग श्रग

आजकाल लांब श्रग घालण्याचा ट्रेंडही पाहायला मिळत आहे. वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल अशा कोणत्याही पोशाखांवर महिलांनी लांब श्रग्स घालण्यास सुरुवात केली आहे. लेहेंगा, साडी यांसारख्या आउटफिट्ससोबत तुम्ही लांब श्रग सहज घालू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT