Woman Visits Disney World Every Month Donates Blood Plasma To Cover Costs 
लाइफस्टाइल

रक्तातील प्लाझ्मा विकून महिन्याला Disney Worldची सैर करणारी महिला

सकाळ डिजिटल टीम

हौस पूर्ण करण्यासाठी माणूस काय करेल याचा काही नेम नाही. जर एखाद्याचे लहानपणीपासून स्वप्न पाहिले असेल आणि ते पूर्ण झाले नसेल तर...ती व्यक्ती आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य तो सर्व प्रयत्न करेल. अशीच एका मुलीचे लहानपणीपासूनचे स्वप्न अधर्वट राहिले होते....तिच्या स्वप्नांच्या मध्ये सर्वात मोठा अडथळा होता पैसे. अखेर तिने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी असे पाऊल ऊचलले की त्याचा विचार देखील कोणी करू शकत नाही.

एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी तुम्ही रक्त दान केल्याचे तुम्ही ऐकले असावे पण पेंसिल्वेनिया (Pennsylvania)मध्ये राहणारी लिझ ग्रॅमलिच (Liz Gramlich) हिने रक्तातील प्लाझ्मा विकून आपली फिरण्याची हौस पूर्ण केली आहे.

२८ वर्षांची ग्रैमलिचने डिज्नी वर्ल्ड फिरण्यासाठी (Disney World trips) आणि तेथे जाण्यासाठीच्या खर्चासाठी जुगाड म्हणून रक्तातील प्लाझ्मा विकण्याचा निर्णय घेतला आहे. तिने दर आठवड्याला २ वेळा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून तिच्या स्वप्नांमध्ये पैसे अडथळा ठरू नये. (Woman Visits Disney World Every Month Donates Blood Plasma To Cover Costs)

कोरोना काळात 'ग्रामलिच'चा चुकला डिज्नी वर्ल्ड प्रवास

लिझला तिच्या डिज्नी वर्ल्ड ट्रिपचे वेड लागलेले आहे. 2020 च्या उन्हाळ्यापासून तिने ऑर्लॅंडो आणि फ्लोरिडाला सुमारे 15 वेळा भेट दिली आहे आणि 2022 मध्ये दर महिन्याला किमान एकदा भेट देण्याची योजना आखली आहे. अर्थातच पेनसिल्व्हेनिया ते फ्लोरिडा दरमहा प्रवास करणे इतके सोपे आणि स्वस्त नाही. त्यामुळे तिचा छंद पूर्ण करण्यासाठी तिने तिचे रक्तातील प्लाझ्मा विकण्याचे ठरवले (To fulfill her hobby, she planned to sell her blood).

खरं तर, ग्रॅमलिच हिला लहानपणी एकदा डिज्नी वर्ल्ड ट्रिपला गेली होती, तेव्हापासून तिला पुन्हा तिथे जायचे होते. 2020मध्ये तिने ही हौस पूर्ण देखील केली. पण नंतर कोरोना महामारीमुळे सर्व काही ठप्प झाले आणि त्यांची योजना रद्द झाली. त्यामुळे 2022 मध्ये त्यांनी जवळपास दर महिन्याला इथे येण्याचे ठरवले.

प्लाझ्मा दान करून ती दुसऱ्यांना मदत करत आहे

ग्रॅमलिचकडे डिस्नी वर्ल्ड पास होता पण ये-जा करण्यासाठी फ्लाइटची तिकिटे, हॉटेलमध्ये राहणे आणि खाण्यापिण्याची व्यवस्था हेही तितकेच मोठे आव्हान होते. दुसरीकडे, ग्रॅमलिच आधीपासून रक्तातील प्लाझ्मा दान करत आहे पण त्याच्यामुळे इतरांना होणाऱ्य फायद्यांकडे कधीच लक्ष दिले गेले नाही. पण आता तिला वाटू लागले की, ''यातून कमाई करून ती तिची गरजही पूर्ण करू शकते आणि तिच्या प्लाझ्मामधून दुसऱ्याला जीवदान मिळत आहे.''

त्त्यामुळे तिने रक्तातील प्लाझ्मा दान करण्याची वारंवारता वाढविण्याचा विचार केला आणि आठवड्यातून दोनदा रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. आठवड्यातून दोनदा प्लाझ्मा दान करून तिला 56823 ते 94662 रुपये मिळायचे. त्यातील जास्तीत जास्त खर्च थीम पार्कवर करण्याचे तिने ठरवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

FIFA World Cup: आधी संघाचा पराभव अन् पत्रकार परिषदेत कोचला मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी; Video

Escort Allowance Scheme: शाळेत येण्या-जाण्यासाठी मिळणार सरकारी भत्ता; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UP सरकारची संवेदनशील योजना

Latest Marathi News Live Update : तिकिटाच्या वादातून एसटी वाहकाला बेदम मारहाण; हिंगोली डेपो बंद ठेवत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT