Women Men  Sakal
लाइफस्टाइल

Women Brain : बायकांचा मेंदू पुरुषांपेक्षा फास्ट; संशोधकांनी केला दावा

महिलांमध्ये 50 वर्षांच्या वयातही प्रत्येक शब्द लक्षात ठेवण्याची क्षमता असते.

सकाळ डिजिटल टीम

Women Brain More Active Than Men : महिलांचा मेंदू पुरूषांच्या मेंदूपेक्षा वेगवात असतो असा दावा, संशोधकांनी केला आहे. महिलांमध्ये 50 वर्षांच्या वयातही प्रत्येक शब्द लक्षात ठेवण्याची क्षमता असते. नॉर्वेच्या बर्गन विद्यापीठात झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.

संशोधनासाठी टीमने गेल्या अनेक वर्षांतील पुरुष आणि महिलांच्या मानसिक कौशल्यांचा डेटा गोळा केला. याच्या विश्लेषणात 3 लाख 50 हजारांहून अधिक सहभागींचा डेटा घेण्यात आला. यात महिलांमध्ये अस्खलितपणे बोलण्याचे कौशल्य अधिक असल्याचेही समोर आले आहे.

महिलांची स्मरणशक्तीही पुरुषांपेक्षा चांगली आहे. विशिष्ट अक्षर किंवा श्रेणीने सुरू होणारी नावे आणि शब्द शोधण्यात आणि लक्षात ठेवण्यात महिला अधिक चांगल्या असतात असा दावा संशोधकांनी केला आहे.

संशोधक मार्को हिर्स्टीन यांचे मते, बौद्धिक कौशल्याच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष यांच्यात कोणताही फरक नाही. महिलांमध्ये, मेंदूच्या कॉर्टेक्स आणि लिंबिक प्रणालीमध्ये अधिक रक्त प्रवाह असतो आणि द्रवपदार्थाचे प्रमाण देखील जास्त असते. ज्यामुळे त्यांचा मेंदू पुरुषांपेक्षा अधिक सक्रिय असतो.

स्वीडनमधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या एका संशोधनानुसार, स्त्रिया चेहरे लक्षात ठेवण्यास अधिक प्रभावी असतात. इतकंच नाही तर, स्त्रिया चेहेरे आणि वासांसारख्या संवेदन आठवणीही अधिक चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT