mehndi  sakal
लाइफस्टाइल

Beauty Tips: नखांना लागलेली मेहंदी झटपट काढण्याचे घरगुती उपाय, जाणून घ्या

नखांवर लागलेली मेहंदी काढण्याचे सोपे घरगुती उपाय.

Aishwarya Musale

प्रत्येक सणात महिलांना अनेकदा हातावर मेहंदी लावायला आवडते. मात्र, हातावर मेहंदी लावताना कधी कधी नखांवरही मेहंदी लागते. त्यामुळे तुमची नखे घाण दिसू लागतात. त्याचबरोबर मेंदी लावलेल्या नखांवर नेलपॉलिशचा रंग स्पष्टपणे दिसत नाही.

अशा परिस्थितीत, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने मिनिटांत नखांवर लावलेली मेंदी काढू शकता.

नखांवरून मेहंदीचा रंग काढण्यासाठी लोक अनेकदा मेहंदी निघण्याची वाट पाहत असतात. म्हणूनच, आम्ही तुम्हाला काही प्रभावी उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही तुमचे नखे स्वच्छ आणि चमकदार बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया नखांवरून मेहंदीचा रंग काढण्यासाठीच्या टिप्स.

खोबरेल तेल वापरा

खोबरेल तेलाच्या मदतीने तुम्ही तुमच्या नखांवरची मेहंदी एका क्षणात घालवू शकता. यासाठी पॅनमध्ये पाणी गरम करा. लक्षात ठेवा की पाणी जास्त गरम नसावे. आता तुमच्या नखांना खोबरेल तेल लावा आणि नंतर पॅनमध्ये ठेवलेल्या कोमट पाण्यात हात घाला.

यानंतर, नखांना बोटाने रब करा. थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल की तुमच्या नखांवर लावलेला मेहंदीचा रंग नाहीसा होईल आणि तुमचे हात देखील पूर्वीपेक्षा मऊ आणि उजळ दिसू लागतील.

साखर आणि लिंबाची मदत घ्या

साखर आणि लिंबू वापरूनही तुम्ही तुमची नखे सहज स्वच्छ करू शकता. यासाठी एका छोट्या भांड्यात साखर घ्या. आता त्यात लिंबाचा रस घालून लिक्विड तयार करा. नंतर हे लिक्विड नखांवर लावा आणि स्क्रब करा. लक्षात ठेवा की फक्त हलक्या हातांनी नखे चोळा.

तुम्ही खूप घासल्यास तुमच्या नखांवर स्क्रॅच येऊ शकतात. काही वेळ स्क्रब केल्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुवा. यामुळे नखांवरचे मेहंदीचे डाग दूर होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arab Israelis: नेतन्याहू यांच्या खूर्चीला हदरा देणारे २० लाख अरब आले कुठून? इस्रायलमध्ये सत्तापालट होण्याच्या मार्गावर

Latest Marathi News Live Update : दिवाळीत ठाणे ATS ची मोठी कारवाई; १० लाखांचे बक्षीस असलेला फरार नक्षलवादी अटकेत

Tamil Nadu News: तमिळनाडूतील नववधूंना आठ ग्रॅम सोन्याचे नाणे अन् रेशमी साडी; सरकारची नवी योजना

IND-A vs NZ-A Live Score: यशस्वी जैस्वालचा शतकी धडाका... सलग दुसऱ्या सामन्यात किवी गोलंदाजांना ठोकून काढले; १६ चौकार, २ षटकार अन्...

MPSC Exam : ‘एमपीएससी’ गट-क पूर्वपरीक्षा लांबणीवर;आता होणार २४ जानेवारीला; पदसंख्येत ११ हजार १० जागांची वाढ

SCROLL FOR NEXT