fashion Sakal
लाइफस्टाइल

Women Fashion : सर्वांमध्ये दिसायचंय हटके! लेटेस्ट डिझाइन असलेले हे इंडो-वेस्टर्न आऊटफिट एकदा ट्राय करा

तुम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये सूट घालण्याचा विचार करत असाल, तर हे कोटी स्टाइल सूट वापरून पाहू शकता.

सकाळ डिजिटल टीम

कार्यक्रम कोणताही असो.. महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर.. एकतर साड्या किंवा सलवार सूट घालण्यास पसंती देतात. सध्या बाजारात अनेक प्रकारचे सूट आले आहेत. तुम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये सूट घालण्याचा विचार करत असाल, तर हे कोटी स्टाइल सूट ट्राय करून पाहू शकता.

जॉर्जेट कोटी स्टाइल सूट

जर तुम्हाला सुंदर दिसायचे असेल तर तुम्ही या प्रकारचा सूट घालू शकता. हे सूट जॉर्जेट फॅब्रिक आणि थ्री पीसमध्ये आहेत. तुम्ही या प्रकारचा सूट कोणत्याही खास प्रसंगी घालू शकता आणि या सूटमध्ये आकर्षक लूक मिळवण्यासाठी महिला या सूटसोबत हील्स घालू शकतात. या सूटसोबत तुम्ही ज्वेलरी म्हणून चोकर घालू शकता. हा सूट तुम्ही बाजारातून तसेच ऑनलाइन खरेदी करू शकता, ज्याची किंमत 700 ते 1000 रुपये आहे.

fashion

नेट सलवार सूट विथ कोटी

लग्नात किंवा कोणत्याही खास प्रसंगी तुम्ही या प्रकारचा आऊटफिट घालू शकता. तुम्ही बाजारातून या प्रकारचे कोटी स्टाइल नेट सलवार सूट खरेदी करू शकता. हा आऊटफिट तुम्हाला ऑनलाइन देखील मिळेल. या आउटफिटमध्ये स्टायलिश लूक मिळवण्यासाठी तुम्ही झुमके किंवा चेन टाईप नेकलेस घालू शकता. तसेच हील्स किंवा फ्लॅट्स घालू शकता. हा सूट तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत मिळेल.

fashion

कोटी स्टाइल सूट

हा सूट तुम्ही प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये घालू शकता आणि या सूटसोबत तुम्ही फ्लॅट्स घालू शकता. तुम्ही या प्रकारचा सूट 1200 ते 1500 रुपयांपर्यंत मिळेल. तुम्हाला हा सूट ऑनलाइन आणि बाजरात देखील मिळेल.

fashion

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT