लाइफस्टाइल

Women Fashion : परफेक्ट फॉर्मल लुकसाठी हे शर्ट स्टाइल करा, दिसाल सुंदर

महिलांसाठी बेस्ट फॉर्मल शर्ट जे आहेत अत्यंत स्टायलिश...

Aishwarya Musale

ऑफिसमध्ये आपण अनेकदा फॉर्मल ड्रेस कोड फॉलो करतो. यासाठी आपण एथनिक तसेच वेस्टर्न वेअरमध्ये फॉर्मल आउटफिट्स सर्च करतो जेणेकरून आपण परफेक्ट दिसू. यावेळी, परफेक्ट दिसण्यासाठी या शर्टच्या स्टाईल किंवा रंग वापरून पाहा. हे अगदी सोपे पण ऑफिससाठी उत्तम आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हिवाळ्यात पॅन्ट, स्कर्ट आणि स्वेटरच्या खालीही घालू शकता.

ग्रे कलर फॉर्मल शर्ट

जर तुम्हाला डार्क कलर आवडत असतील तर तुम्ही ग्रे कलर ट्राय करू शकता, हा कलर आजकाल ट्रेंडमध्ये आहे. हा रंग तुम्ही परिधान करू शकता. यामध्ये तुम्ही चेक डिझाईन घेऊ शकता, नाहीतर सिंपल शर्टही यामध्ये चांगले दिसतात. यामध्ये तुम्हाला डार्क आणि लाइट कलर मिळतील. पण काळ्या रंगाच्या ट्राउझर्ससोबत डार्क कलर अधिक चांगला दिसेल. बाजारात तुम्हाला फॉर्मल शर्ट 500 रुपयांना मिळेल.

मरुन कलर फॉर्मल शर्ट

जर तुम्हाला काही वेगळे करून पहायचे असेल तर यासाठी मरून रंगाचा शर्ट घाला. तो फॉर्मल लूकसाठी देखील चांगला दिसतो. यामध्ये तुम्हाला अनेक चांगल्या डिझाईन्स मिळतात. त्याची खास गोष्ट म्हणजे यामध्ये प्लेन कलर्स अधिक चांगले दिसतात आणि तुम्ही त्यात कोणत्याही रंगाचे ट्राउझर्स मिक्स-मॅच करू शकता. बाजारात तुम्हाला ते कॉटनसोबतच नायलॉन फॅब्रिकमध्येही मिळेल. जे तुम्ही बाजारातून 250 ते 500 रुपयांना खरेदी करू शकता.

ब्लॅक कलर फॉर्मल शर्ट

फॉर्मल लूकसाठी तुम्ही ब्लॅक कलर स्टाइल करू शकता, फक्त शर्टमध्येच नाही तर तो प्रत्येक आउटफिटमध्ये चांगला दिसतो. पण यासोबत तुम्हाला लाईट कलरचे बॉटम घालावे लागेल. जेणेकरून ते परफेक्ट दिसेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही चेक किंवा डॉट डिझाइन असलेला शर्ट घेऊ शकता. बाजारात तुम्हाला अनेक डिझाईन्स मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT