Women Hairstyle  esakal
लाइफस्टाइल

Women Hairstyle : महिलांनो कियारा अन् अनन्याच्या हेअर स्टाइलमधून घ्या इंस्पिरेशन, सणांच्या दिवसांत असं व्हा रेडी

तुम्हाला कमी वेळात अगदी हटके हेअर स्टाइल करायची असेल तर सेलिब्रिटींच्या हेअरस्टाइलमधून तुम्ही इंस्पिरेशन घेऊ शकता.

साक्षी राऊत

Women Hairstyle In Festive Season : सप्टेंबर महिन्यामध्ये बरेच सण असून या महिन्यापासून भारतीय सणांना सुरुवात झाली आहे. महिलांना सणांच्या दिवसांत नटून थटून तयार होण्याची विशेष आवड असते. पण त्याचबरोबर सणाच्या दिवशी घरातसुद्धा त्यांची सणासाठीच्या तयारीची धावपळ सुरु असते, मग कमी वेळात झटपट कसं रेडी होता येईल हाच विचार प्रत्येक महिलेच्या मनात येत असावा. तुम्हाला कमी वेळात अगदी हटके हेअर स्टाइल करायची असेल तर सेलिब्रिटींच्या हेअरस्टाइलमधून तुम्ही इंस्पिरेशन घेऊ शकता.

अनन्या पांडेचा लो बन

अनन्या पांडेच्या फॅशन स्टाइलपासून अनेक महिला इंस्पिरेशन घेतात. तिच्या नव्या ड्रीमगर्ल या चित्रपटासाठी ती एथनिक आणि वेस्टर्न दोन्ही स्टाइल्समध्ये दिसून आली. तुम्ही लेहंगा किंवा लाँग स्कर्ट टाइप कपडे घालणार असाल तर अनन्या पांडेप्रमाणे साइट पार्टेड हेअरमध्ये लो स्लीक बन करू शकता. ही बन हेअरस्टाइल फार सोपी आहे. त्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

सगळ्यात आधी कंगव्याच्या मदतीने साइट पार्टेशन हेअर करून घ्या.

मग केसांची लो पोनी रबर बँडच्या मदतीने करून घ्या.

आता पोनीचे दोन भाग करून आता त्याला क्रिस क्रॉस स्टाइलमध्ये गुंडाळून घ्या.

आता सगळ्यात खाली रबर बँड लावा.

आता पोनीवर लावलेल्या रबर बँडच्या आजूबाजूने क्रिसक्रॉस पॉनीला गुंडाळून जुडा पिनच्या साहाय्याने फिक्स करा.

तुम्ही इझी आणि क्विक हेअरस्टाइल रेडी आहे. यात तुम्ही ग्रेसफुल आणि हटके दिसाल.

मृणाल ठाकूरप्रमाणे गजरा लावा

गजरा तसा तर फार ट्रॅडिशन दिसतो. मात्र तुम्ही मृणाल ठाकूरप्रमाणे लावाल तर अगदी हटके दिसाल.

सगळ्यात आधी केसांचे सेंटर साइड पार्टेशन करा.

आता केसांच्या फ्रंट केसांवर पातळ पॉनी करून मागे फिक्स करा.

आता केसांना बॅक कॉम्ब करून पिनेने फिक्स करा.

आता गजरा पिन लावलेल्या ठिकाणी फिक्स करा.

तुम्ही केसांना ब्लो ड्राय किंवा वेवी लुकसुद्धा देऊ शकता. (Hairstyle)

कियारा आडवाणीचा हाफ पोनीटेल

ट्रॅडिशनल आउटफिटसह कियारा आडवाणीप्रमाणे केसांमध्ये हाफ बन किंवा पोनीसुद्धा बनवू शकता. हे लुक फार सुंदर दिसेल. तसेच केसांत फ्रंट साइट पार्टेशन करा. (Fashion)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi case: सोनिया गांधींच्या अडचणी वाढणार? दिल्लीच्या कोर्टात आता नवीन तक्रार दाखल!

Onion : मुंबईत २४ रुपये किलोने मिळणार कांदा! केंद्र सरकारची सवलत योजना; फिरत्या वाहनाद्वारे विक्री

Nashik News : छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ

ODI World Cup सुरू होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार क्रिकेटर झाली संघाबाहेर; बदली खेळाडूचीही घोषणा

Manoj Jarange: विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला; भुजबळांना म्हणाले, चर्चेत का सहभागी झाला नाहीत?

SCROLL FOR NEXT