लाइफस्टाइल

Menopause Care : रजोनिवृत्तीच्या काळात महिलांनी घ्यावी अशी काळजी; जीवनशैलीत करा 'हे' बदल

रजोनिवृत्तीच्या काळात महिलांनी घ्यावी अशी काळजी

Aishwarya Musale

वाढत्या वयाबरोबर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. 45-50 वर्षांच्या वयात अशी वेळ येते जेव्हा रजोनिवृत्तीमुळे मासिक पाळी थांबू लागते. त्यामुळे शरीरात इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी कमी होऊ लागते.

हार्मोनल बदलांमुळे महिलांना मूड स्विंग, केस गळणे, वजन वाढणे, तणाव, झोप न लागणे, थकवा, अशक्तपणा अशा अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या काळात महिलांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी.  मेनोपॉजचा काळ अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळण्यासाठी पुढील टीप्स फॉलो करु शकता. 

नट्स आणि सीड्स

भिजवलेल्या नट्स आणि सीड्सने तुमच्या दिवसाची सुरुवात करा. ते फायटोस्ट्रोजेन्समध्ये समृद्ध असतात, जे हार्मोन्सवर कार्य करतात. याव्यतिरिक्त, ते ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे एक चांगले स्त्रोत आहेत, जे सांधेदुखी, मूड बदलणे यासारख्या समस्यांपासून आराम देतात.

भोपळा, तीळ, सूर्यफूल यांसारख्या बिया आणि बदाम हे पोषक तत्वांचे पावर हाउस आहेत. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि आवश्यक फॅटी ऍसिड असतात, ज्यामुळे रजोनिवृत्तीची लक्षणे कमी होतात. याशिवाय नट्समध्ये मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स देखील असतात, जे तणाव, थकवा आणि चिंता कमी करतात.

नाचणीचा आहारात समावेश करा

तुमच्या रोजच्या आहारात 100 ग्रॅम नाचणीचा समावेश करा. कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत असल्याने, ते आरोग्यासाठी आश्चर्यकारक कार्य करते. रजोनिवृत्ती ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडे कमकुवत होण्याची शक्यता असते.

रजोनिवृत्तीनंतर वजन कमी करणे कठीण होते, परंतु नाचणीचे पीठ वजन कमी करण्यास मदत करते. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते, ते ग्लूटेन फ्री असते आणि ते पचायलाही सोपे असते.

अश्वगंधा

रजोनिवृत्ती दरम्यान, मूड बदलणे आणि तणाव यांसारखी लक्षणे सर्वात त्रासदायक असतात. अश्वगंधा तुमच्या मूड स्विंग्सवर काम करते आणि कोर्टिसोल पातळी कमी करते. त्यामुळे रोज झोपण्यापूर्वी अश्वगंधा घ्या. ते पाण्यात किंवा दुधात मिसळून सेवन करा. जर तुम्हाला रात्री घाम येण्याची समस्या असेल तर अश्वगंधा खूप मदत करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India च्या विमानाने उड्डाण घेताच इंजिनमध्ये बिघाड, दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं Emergency Landing ; अहमदाबाद अपघाताची पुनरावृत्ती टळली!

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट ! ४० लाख लाभार्थी अपात्र ठरणार? महिला व बालकल्याण विभागाकडून संकेत

Mumbai Indiansचे भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात वर्चस्व! MI चे ४, तर KKR चे ३ जणं; RCB, RR, LSG चे एकही खेळाडू नाही

आधी केला न्यूड कॉल मग लग्नाचा दबाव, दोन दिवस सोबत राहिली अन्...सत्य समोर येताच तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली!

Latest Marathi News Live Update : संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

SCROLL FOR NEXT