लाइफस्टाइल

Health Care News : मासिक पाळीत जाणवतोय जास्त थकवा? मग लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' बदल

'या' कारणांमुळे मासिक पाळीत जास्त थकवा जाणवतो, जाणून घ्या

Aishwarya Musale

मासिक पाळीचे ते चार दिवस महिलांसाठी खूप कठीण असतात. मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात दुखणे, हेवी फ्लो, पेटके आणि अशक्तपणा सामान्य आहे. परंतु काही महिलांना या काळात खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. कधी कधी अंथरुणावरून उठणेही कठीण होते. असे का होते हे जाणून घेऊया.

मासिक पाळी दरम्यान जास्त थकवा का येतो?

मासिक पाळी दरम्यान, ज्यांचे हिमोग्लोबिन आधीच कमी आहे अशा लोकांना जास्त थकवा जाणवतो. एचबीच्या कमतरतेमुळे ॲनिमियासारख्या समस्या उद्भवतात. या काळात, हेवी फ्लोमुळे, रक्त कमी होते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि गरजेपेक्षा जास्त थकवा जाणवतो.

मासिक पाळीच्या काळात इस्ट्रोजेन हार्मोनची कमतरता असते. त्यामुळे महिलांनाही थकवा जाणवतो. मासिक पाळी संपली की, या हार्मोनची पातळी कायम राहते.

मासिक पाळीच्या वेळी ब्लोटिंग आणि पोटदुखीमुळे अनेकदा महिलांना त्रास होतो. त्यामुळे अनेकवेळा जेवण वगळले जाते. अशा परिस्थितीत थकवा आणि अशक्तपणा वाटणे स्वाभाविक आहे. कारण तुमच्या शरीरात सतत रक्त कमी होत असते.

पीरियड्स दरम्यान, तुमच्या स्ट्रेस हार्मोनचे प्रमाण म्हणजेच कोर्टिसोल वाढते. यामुळे, तुम्हाला नेहमी चिडचिड वाटते आणि मूड स्विंग्स होते. स्ट्रेस हार्मोन तुमच्या शरीराच्या एकूण कार्यावर परिणाम करते. यामुळे तुम्ही थकलेले राहतात.

मासिक पाळी दरम्यान या गोष्टी लक्षात ठेवा

मासिक पाळी दरम्यान जेवण वगळणे टाळा. तुमच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा.

स्वत:ला ऊर्जावान ठेवण्यासाठी पुरेशी झोप घ्या, यामुळे हॅप्पी हार्मोन्स तयार होतात. मूड स्विंग आणि थकवा यापासून आराम मिळतो.

व्यायाम करा. यामुळे तुमचे रक्ताभिसरण सुधारते. हॅप्पी हार्मोन्स बाहेर पडतात.

अशक्तपणा दूर करण्यासाठी, दिवसभर पुरेसे पाणी प्या. डिहायड्रेशनमुळे थकवा आणि समस्या देखील होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT