लाइफस्टाइल

Period Pain Relief : मासिक पाळीत खूप पोट दुखतं? मग करा हे उपाय, पोटदुखी होईल कमी...

मासिक पाळीत खूप पोट दुखतं? मग करा हे उपाय

Aishwarya Musale

मासिक पाळीदरम्यान पोट, ओटीपोट आणि कंबरदुखीच्या त्रासाचा सामना प्रत्येक महिलेला करावा लागतो. अनेक वेळा काही महिलांना मासिक पाळीत जास्त वेदना सहन कराव्या लागतात. पीरियड्समध्ये प्रत्येक महिला कित्येक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांमुळे त्रस्त असते. पण यापैकी सर्वात सामान्य समस्या म्हणजे ओटीपोटामध्ये असह्य अशा वेदना होणे. मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्रास कमी होतो. 

अशा परिस्थितीत, मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी, तुम्ही घरगुती उपचारांची मदत घ्यावी. मात्र, दर महिन्याला या दिवसांत तुम्हाला तीव्र वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय प्रभावी आहेत.

गरम पाण्याचा शेक

हा तर सगळ्यात उपयुक्त उपाय आहे. गरम पाणीचा शेक हा एखाद्या पेनकिलर गोळीचं काम करतो. या दिवसात ओटीपोट आणि कंबर प्रचंड दुखत असते. यामुळे स्नायूंना आराम मिळेल.

हर्बल चहा

वेदना कमी करण्यासाठी, कॅमोमाइल किंवा पेपरमिंट चहा प्या. मासिक पाळी दरम्यान असे केल्याने तुम्हाला वेदनांपासून आराम मिळेल. या गोष्टींमध्ये असलेल्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, मासिक पाळीच्या वेदना कमी होतात आणि हार्मोनल संतुलन देखील राखले जाते.

पीरियड क्रॅम्पसाठी व्यायाम करा

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी व्यायाम देखील प्रभावी आहे. हे नैसर्गिक पेनकिलरसारखे काम करते. म्हणून, मासिक पाळीत शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा.

कोमट तेलाने मालिश

या दिवसांमध्ये कंबर, ओटीपोट दुखतं अशावेळी कोमट तेलाने मालिश केल्यास तुम्हाला आराम मिळतो. मालिश केल्याने शरीराचे काही पॉईंट्स दाबले जातात त्यामुळे शरीराच्या नसा मोकळ्या होतात.

गरम पाण्याने आंघोळ

या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करा. यामुळे शरीराच्या नसा मोकळ्या होतात.

हे पदार्थ खाणे टाळा

या दिवसांमध्ये चहा, कॉफी, आणि काही शीतपेय टाळावीत.

हे पदार्थ खा

हर्बल टी, ग्रीन टी, बडीशेप, दालचिनी, आलं, हिरव्या भाज्या, चिकन, मासे, अक्रोड, बदाम, पपई आणि केळी खायला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT