लाइफस्टाइल

Women Health : महिलांनो, मेनोपॉजच्या काळात त्वचेचे होऊ शकते नुकसान, अशी घ्या काळजी..

मेनोपॉज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यातून प्रत्येक स्त्रीला एक ना एक दिवस जावे लागते. या काळात प्रत्येक स्त्री अनेक शारीरिक आणि मानसिक बदलातून जात असते.

Aishwarya Musale

मेनोपॉज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यातून प्रत्येक स्त्रीला एक ना एक दिवस जावे लागते. या काळात प्रत्येक स्त्री अनेक शारीरिक आणि मानसिक बदलातून जात असते. जसे की, योनीभागातला कोरडेपणा, दाताच्या तक्रारी, हॉट फ्लॅशेश, मूड स्विंग्ज, रात्री अचानक घाम फुटणं अशा कितीतरी तक्रारींसोबत आणखी एक तक्रार असते ती त्वचेची.

त्वचा पातळ होते, सुरकुत्या दिसू लागतात आणि त्वचेवर डार्क पिगमेंटेशन होऊ लागते. रजोनिवृत्तीदरम्यान होणाऱ्या या समस्यांमुळे तुम्हालाही काळजी वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला तज्ञांकडून काही उपाय सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही स्किनची काळजी घेऊ शकता.

अशी घ्या काळजी

रजोनिवृत्तीच्या काळात शरीरातील कोलेजन कमी होण्यास सुरुवात होते त्यामुळे त्वचेतील कोरडेपणा वाढतो. नैसर्गिक तेल कमी होऊ लागते. महिलांनी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. संत्री, द्राक्षे, किवी ही सर्व फळे खाल्ल्याने कोलेजन वाढण्यास मदत होते.

पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. कमी झोपेमुळे त्वचेच्या लवचिकतेवर परिणाम होतो.

रजोनिवृत्ती दरम्यान, शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे चिंता, नैराश्य, मूड स्विंग यांसारख्या समस्या उद्भवतात, अशा स्थितीत तणाव मर्यादित करण्यासाठी ध्यान केले पाहिजे. तणाव कमी केल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.

रजोनिवृत्ती दरम्यान नियमित व्यायाम करणे महत्वाचे आहे. व्यायामामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहता, त्यामुळे तणाव कमी होतो आणि चांगली झोप येण्यास मदत होते.

या काळात हायड्रेशनची पूर्ण काळजी घ्या. पाण्याव्यतिरिक्त, आपण आपल्या आहारात फळांच्या रसांचा समावेश करणे आवश्यक आहे, यामुळे हॉट फ्लॅशेशपासून आराम मिळतो आणि त्वचा देखील चमकदार राहते.

घराबाहेर पाऊल टाकताना सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर पडू नका. एसपीएफ 30 किंवा त्याहून जास्त असलेलं सनस्क्रीन योग्य.

कितीही असह्य झालं तरी खाजवू नका. त्रास होत असेल तर थंड पाण्याने चेहरा धुवा नखं टोकदार ठेवू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

रवि किशन यांना लेकीनेच केलं ट्रोल; रिव्हाचा भन्नाट Reel पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, Viral Video

Amboli Tourist Accident : मुसळधार पाऊस अन् दाट धुक्यात धाडसी मोहीम! सह्याद्री रेस्क्यू टीमने 400 फूट खोल दरीतून बाहेर काढला निपाणीतील डॉक्टराचा मृतदेह

Marathi News Live Updates : झाशीहून प्रयागराजला परतताना भीषण अपघात; अतीक अहमदचा धाकटा मुलगा अबान अहमदचा मृत्यू

370 रुपयांच्या बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेचं कमबॅक; पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'

SCROLL FOR NEXT