Women Health esakal
लाइफस्टाइल

Women Health : मासिक पाळीच्या आधी स्तनांमध्ये दुखणं सामान्य आहे का?

अनेक महिला याचा सामना करत आहेत पण त्याकडे त्या दुर्लक्ष करतात

Pooja Karande-Kadam

Women Health :

मासिक पाळी येणार असेल तेव्हा किंवा आल्यानंतर अनेक महिलांना दुखण्याचा सामना करावा लागतो. ज्यात पोट दुखी, ओटीपोटातील तिव्र वेदना, मांडीतून पेटके येणे असे प्रकार असतात. पण सध्याच्या महिलांमध्ये पाळी येण्याआधी स्तनांमध्ये वेदना होण्याचे प्रकार वाढले आहेत.

अनेक स्त्रियांना मासिक पाळीपूर्वी स्तनात वेदना होतात, ज्याला चक्रीय मास्टॅल्जिया म्हणतात. स्तनदुखीची लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये बदलतात. काही सामान्य लक्षणांमध्ये तीव्र वेदना, स्तन लूज पडणे, स्तन अति घट्ट होणे, सूज येणे आणि स्तनाग्रांमध्ये अतिसंवेदनशीलता होणे, यांचा समावेश होतो. काही महिलांना अंडरआर्म्समध्ये वेदना देखील जाणवते.

मासिक पाळीपूर्वी स्तन दुखणे हे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांच्या बदलांमुळे होते. असंतुलन स्तनाच्या ऊतींमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आणि जळजळ सुरू होते, ज्यामुळे स्तन लूज पडतात .

मासिक पाळीपूर्वी स्तन दुखणे

'स्तनदुखी ही महिलांना मासिक पाळीपूर्वी जाणवणाऱ्या सामान्य लक्षणांपैकी एक आहे. 2015 च्या 400 महिलांच्या अभ्यासात असे दिसून आले की त्यांच्यापैकी 60 टक्के महिलांना सर्कल मास्टॅल्जियाचा अनुभव आला. एशियन पॅसिफिक जर्नल ऑफ ट्रॉपिकल बायोमेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की 22.5 टक्के आणि 37.5 टक्के महिलांना सौम्य आणि मध्यम ते तिव्रतेच्या वेदना झाल्या आहेत.

या वेदनांपासून सुटका करून घेण्याचे काही उपाय आपण पाहुयात.  

आईस पॅक वापरा

कोल्ड कॉम्प्रेस किंवा आइस पॅकचा वापर वेदना कमी करण्यासाठी किंवा जखमांचे व्यवस्थापन करण्यासाठी खूप प्रभावी असू शकतो. तुमच्या स्तनांवर थोड्या काळासाठी बर्फाने शेक घेतल्याने देखील सूज आणि वेदना कमी होऊ शकतात.

गरम पाण्याने अंघोळ करा

ही थंडीची वेळ आहे, म्हणून उबदार अंघोळ केल्याने तुमचे स्नायू मोकळे होतील. आणि स्तनांमधील अस्वस्थता कमी होईल. पण पाणी जास्त गरम करू नका, कारण ते तुमची त्वचा कोरडी करू शकते. तूम्ही गरम पाण्याच्या पिशवीने स्तनांवर शेक घेऊ शकता.

स्तनांना मालिश करा

स्तनांना मसाज घेण्यासाठी तुम्हाला स्पामध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही स्वत:च केलेला मसाज त्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. मसाज केल्याने स्तनांमधील अकडलेले स्नायू मोकळे होतात आणि तिथला रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे स्तनांतील वेदना कमी होऊ शकतात.

हलका व्यायाम करा

जेव्हा तुम्हाला मासिक पाळी येते तेव्हा व्यायाम करणे ही तुमच्या मनातील शेवटची गोष्ट असते. तुम्ही वेदना कमी करण्यासाठी आणि तुमचा मूड सुधारण्यासाठी वॉकिंग सारखे कमी प्रभावाचे व्यायाम करून पहा. ज्यामूळे स्तनांची हालचाल होईल. (Women Health)

जास्त ताण घेऊ नका

तुम्हाला येत असलेल्या तणावामुळे स्तनांवर सूज चढू शकते. त्यामुळेही स्तनांमध्ये वेदना होऊ शकतात. त्यामुळे वेदना कमी करण्यात मदत करण्यासाठी ध्यान किंवा दीर्घ श्वासोच्छ्वास यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करा.

दुधात हळद

हळद हा स्वयंपाकघरातील एक सामान्य घटक आहे. जो शरीरासाठी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो. त्यामुळे सूज कमी होऊ शकते. स्तनातील दुखी कमी करण्यासाठी कोमट दुधात थोडी हळद मिसळून प्या. पाळीच्या आधी हा उपाय केल्याने स्तन दुखणे कमी होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT