Yoga  sakal
लाइफस्टाइल

International Yoga Day 2023: महिलांनी रोज करावी ‘ही’ योगासने, जिमला न जाताच मिळेल स्लिम लूक!

वयानुसार महिलांच्या शरीरात बदल होत राहतात.

Aishwarya Musale

वयानुसार महिलांच्या शरीरात बदल होत राहतात. मासिक पाळी, गर्भधारणा आणि मेनोपॉजमुळे महिलांच्या शरीरात सतत बदल होत असतात. त्यामुळे महिलांच्या शरीरात स्टॅमिनाही कमी होतो. अनेक स्त्रियांमध्ये पाठदुखी, हात-पाय दुखणे आणि हाडे कमकुवत होण्याची समस्या कायम असते. अशा परिस्थितीत महिलांसाठी काही योगासने येथे सांगण्यात आली आहेत. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी महिला नियमितपणे ही योगासने करू शकतात.

वृक्षासन - महिलांसाठी वृक्षासन खूप फायदेशीर आहे. हे योगासन केल्याने शरीराचा समतोल राखण्यास मदत होते. या आसनामुळे तुमचे पाय मजबूत होतात. हे आसन केल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.

नौकासन - नौकासन केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन केल्याने पाय आणि हातांचे स्नायू मजबूत होतात. नौकासन केल्याने तुमची पचनक्रियाही निरोगी राहते. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्याही दूर होतात.

बद्धकोनासन - बद्धकोनासनामुळे रक्ताभिसरण सुधारते. या आसनामुळे थकवा आणि तणाव कमी होतो. हे आसन तुमच्या मणक्यासाठीही खूप फायदेशीर ठरते. यामुळे स्नायू मजबूत होतात.

परिव्रत सुखासन - परिव्रत सुखासन केल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो. या आसनाने तुम्ही शरीराला आणखी लवचिक बनवू शकता. या आसनामुळे तुम्ही पाठीचा कणा आणि खांद्यांची लवचिकताही वाढवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: वांद्र्यात वातावरण चिघळलं! पोलिसांकडून लाठीचार्ज, स्थानिकांकडून दगडफेक; व्हिडिओ व्हायरल

Record: वैभव सूर्यवंशी भारतीय फलंदाजांमध्ये ठरला टॉपर! इशान, तिलक, संजूवर पडला भारी; आणखी दोन धावा अन् वर्ल्ड रेकॉर्ड नावावर...

Maharashtra Political Devlopments : कार्यकर्त्यांना लाल दिव्याची वाहने मिळणार? महायुतीमध्ये महामंडळ वाटपाला वेग; पुढील महिन्यात अंतिम निर्णयाची शक्यता

Alcohol Pouch Sale Ban: टेट्रा पॅकमधील मद्यविक्रीवर कारवाई होणार? सुप्रीम कोर्टाची केंद्र-राज्यांना नोटीस; काय सांगितलं?

पेट्रोल-डिझेल विसरा; आता गाड्यांसाठी येणार नवं फ्यूल, मुंबई नागपुरात सुरु होणार पंप; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT