Women’s Health esakal
लाइफस्टाइल

Women’s Health : महिन्यातून दोनवेळा मासिक पाळी येते? घाबरू नका,समजून घ्या असं का होतं ते?

पंधरा दिवसाला पाळी येणं हे थेट महिलेच्या शरीरातील रक्त पातळीवर परिणाम करते

सकाळ डिजिटल टीम

Women’s Health :

प्रत्येक महिलेचे मासिक पाळीचे चक्र वेगळे असते. कोणाला २७ तर कोणाला ३२ दिवसांनी मासिक पाळी येते. वेळेवर येणारी मासिक पाळी हे एका महिलेच्या सुदृढ शरीराचे लक्षण आहे. पण आजकालची जीवनशैली, सगळ्या गोष्टींना गांभिर्याने न घेणे अशा सवयींमुळे महिलांचे हे पाळीचे चक्र बिघडत चालले आहे.

काही मुली आणि महिलांना महिन्यातून दोनवेळा पाळी येते. म्हणजेच पाळी येऊन गेल्यानंतर १५ दिवसांनी पुन्ही रक्तस्त्राव सुरू होतो. हे एखाद्यावेळेस झालं तर काळजी करण्यासारखं काही नाही. पण ही गोष्ट सतत होत असेल तर मात्र चिंतेची बाब आहे. आज आपण असे का घडते आणि याला कधी गांभिर्याने घ्यायला हवं याबद्दल बोलणार आहोत.

महिन्यातून दोनवेळा रक्तस्त्राव होत असेल तर काय परिणाम होऊ शकतात?

स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते, पंधरा दिवसाला पाळी येणं हे थेट महिलेच्या शरीरातील रक्त पातळीवर परिणाम करते. ज्यामुळे थकवा, डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर अशा आजारांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, १५ दिवसाला पाळी येणं हे प्रेग्नंसीसाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांना त्रासदायक ठरू शकतं.

कारण, पंधरा दिवसाला पाळी आल्याने महिलेचा ओव्हॅल्यूशन काळ ओळखणं अवघड होतं. ज्यामुळे गर्भ राहण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांनी योग्य पद्धतीने संबंध प्रस्थापित करूनही काही फरक पडणार नसतो.

या मागील कारणे काय आहेत?

  1. तज्ज्ञांच्या मते, काहीवेळा महिलांच्या गर्भाशयात गाठ असू शकते. जी महिलांच्या लवकर येणाऱ्या पाळीला जबाबदार असू शकते. गाठ असेल तर रक्तस्त्राव थोड्या दिवसांच्या अंतरानेच होतो. यामुळे महिन्यातून दोनवेळा किंवा त्याहून अधिकवेळाही रक्तस्त्राव होऊ शकतो.

  2. काही महिलांच्या गर्भाशयात फायब्रॉइड असेल तरी देखील महिन्यातून दोनवेळा पाळी येऊ शकते. (Women's Health Tips)

  3. महिलेच्या गर्भाशयातील अंडाशयात असलेल्या गाठीमुळेही असे होऊ शकते. कारण, अंडाशयात काही आजार असेल तर महिलेला हार्मोन्स असंतुलनाचा त्रास होऊ शकतो. यामुळेही मासिक पाळीचे प्रमाण वाढू शकते.

कोणती लक्षणे असतील तर डॉक्टरांकडे जावे?

  • पहिलं लक्षण म्हणजे पंधरा दिवसात पाळी येणं

  • आणि दुसरं म्हणजे ओटीपोटात तिव्र वेदना होणं

  • रक्तस्त्रावातून गुठळ्या पडणं

  • लैंगिक संबंध प्रस्थापित करतेवेळी वेदना होतात

  • पाळीच्या रक्तातून काळे स्पॉट दिसणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : कॉकरोच जनता पार्टी निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार; गांधी जयंतीला देशव्यापी आंदोलनाचा इशारा

Drought in Maharashtra : दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

२४ किलो वजन घटवलं! वनिता खरातने सांगितलं डाएटचं सीक्रेट; म्हणाली, ‘आज माझा चीट डे’

Maharashtra Ganesh Visarjan Live: मिरजेतील पहिल्या गणपतीचे विसर्जन; नदीवेस शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीसाठी गणेश तलावावर जय्यत तयारी

Soybean Crop: व्यथित शेतकऱ्याने पेटवून दिले सोयाबीनचे पीक

SCROLL FOR NEXT