Word Book Day 2024 Sakal
लाइफस्टाइल

Word Book Day 2024: छोट्या दोस्तांचीही लायब्ररी असावी लागते, अरविंद पाटकर यांनी व्यक्त केली अपेक्षा

Word Book Day 2024:पुस्तक दिन एका दिवसापुरता नव्हे, तर 365 दिवसही वाचक दिन का असावा लागतो, असे पाटकर म्हणाले.

सकाळ वृत्तसेवा

Word Book Day 2024 Arvind Patkar expressed hope that even the little kids should have library

अलीकडची पिढी वाचत नाही. सतत मोबाइलवर असते, अशी तक्रार असते. त्यामुळे वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी अगोदर पालक आणि शिक्षकांच्या हातात मोबाइलऐवजी पुस्तके हवीत. शासनाच्या सुंदर शाळा उपक्रमात त्या शाळेत ग्रंथालय असायला हवे. पूर्वी शाळांच्या ग्रंथालयांसाठी जवळपास 12 टक्के अनुदान अनेक वर्षांपासून बंद पडले. ते पुन्हा सुरू करावे, असे मत मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यांनी व्यक्त केले.

23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन. मात्र, पुस्तक दिन एका दिवसापुरता नव्हे, तर 365 दिवसही वाचक दिन का असावा लागतो, असे पाटकर म्हणाले. मुलं पालक व शिक्षकांचे अनुकरण करतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी अगोदर पालक आणि शिक्षकांनी पुस्तके वाचावीत. पूर्वी शाळेतील ग्रंथालयांना अनुदान मिळायचे, ते बंद पडले.

मुलं पर्यावरण, पाणी आदी विषयांसह नेमके काय वाचतात, याचाही अभ्यास हवा. जिल्हाधिकारी कार्यालय, एसटी महामंडळाच्या आवारात शासकीय पुस्तकांची दालने हवीत, असे पाटकर म्हणाले. दुसरीकडे खास लहान मुलांसाठी लायब्ररीचा ट्रेंड आपल्या शहरात सुरू आहे.. ‘मोहल्ला लायब्ररी’द्वारे विद्यार्थ्यांमध्ये लिहिण्या-वाचण्याची आवड निर्माण व्हावी, म्हणून धडपडणारे मिर्झा अब्दुल कय्युम नदवी वाचनसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करतात. ते पुस्तकवाटप उपक्रमात पुढाकार घेतात.

अंजली नलावडे यांनी उल्कानगरी येथे बुक वर्ल्ड लायब्ररी नावाने मुलांसाठी सुरू केलेले ग्रंथालय आहे. यात जगभरातील विविध प्रख्यात लेखकांची पुस्तके, माहितीवर आधारित 4 हजार पुस्तके आहेत. यापैकी 2500 पुस्तके लंडनहून आली. यामध्ये सामान्य ज्ञान, कॉमिक्स, फिक्शन बुक्स, शिष्यवृत्ती, विश्वकोषसारख्या पुस्तकांचा समावेश आहे.

लंडनमध्ये मुलांसाठी निःशुल्क शासकीय ग्रंथालये आहेत. त्याच धर्तीवर शहरात आम्ही 2 ते 16 वयोगटांतील मुलांसाठी लायब्ररी सुरू केली. माझी बहीण लंडनमध्ये राहते. ती तेथून निवड करून पुस्तके पाठवते. मुलांना गोष्टी, फिक्शन पुस्तके वाचणे आवडते. ‘पॉपअप बुक’सारखी पुस्तके मुलांना आवडतात. यात पुस्तक उघडताच चित्रे दिसतात.

— अंजली नलावडे, संचालिका, बुक वर्ल्ड लायब्ररी

अलीकडची मुलं वाचतच नाहीत, हे अजिबात खरे नाही. मोबाइल ही आजची गरज आहे. मराठी ग्रंथव्यवहार, त्यातही ललित साहित्य किमान वितरणव्यवस्थेवर उभे आहे, हे वास्तव आहे. राज्यातील 36 पैकी 20 जिल्ह्यांत ललित साहित्याच्या पुस्तकांची विक्री करणारे एकही दुकान नाही. आपले लोकप्रतिनिधी या विषयावर बोलत नाही. पुस्तके हासुद्धा वारसा आहे. तो जपायला हवा.

— अरविंद पाटकर, मनोविकास प्रकाशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT