World Book Day 2024:  Sakal
लाइफस्टाइल

World Book Day 2024: तंत्रज्ञानाने प्रकाशक, वाचनसंस्कृतीला उभारी; पुस्तक प्रकाशन संस्थांतील तज्ज्ञांनी व्यक्त केला विश्वास

World Book Day 2024: तंत्रज्ञानाने पुस्तक प्रकाशन व्यवसायाय बदल झाला पण अजूनही वाचन संस्कृती आणि पुस्तके टिकून आहेत, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

World Book Day 2024

युनेस्को व अन्य संघटनांच्या पुढाकाराने 23 एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा होतो. वाचनसंस्कृती, प्रकाशक, लेखकांचा आदर करताना यंदा ‘रीड युवर वे’ या थीमवर पुस्तक दिन साजरा होणार आहे.

वर्तमान काळात वाचकांचे वाचनाचे विषय बदलले. तंत्रज्ञानाने पुस्तक प्रकाशन व्यवसायाय बदल झाला पण अजूनही वाचन संस्कृती आणि पुस्तके टिकून आहेत, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला. 

पुस्तके फक्त ज्ञानाचे भांडार नाही तर पुस्तकांसारखा उत्तम मित्र नाही. पुस्तकातून तुम्ही जगाची सफर करता. पुस्तके वेगवेगळ्या विषयांचा परिचय करून देतात. बालपणापासून पुस्तकांशी मैत्री कायम ठेवून वाचनसंस्कृती जोपासावी म्हणून प्रयत्न होतात. प्रकाशन संस्था नाविन्यपूर्ण विषयांवर पुस्तके आणतात.

विषयांचे वैविध्य हे प्रकाशक, लेखक आणि वाचकांनाही हवे असते, असे राजहंस प्रकाशनचे अप्रूप देशपांडे यांनी नमूद केले. साकेत प्रकाशनाचे साकेत भांड यांनीही वाचनसंस्कृती आणि पुस्तकांवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. कोव्हिडच्या काळात झालेले ऑनलाइन पुस्तकांना मागणी होती.

गर्भसंस्कार, नैतिक मूल्यांची पुस्तकांना मागणी आहे. तरी अजूनही श्यामची आई, शिवाजी महाराजांवरील पुस्तके आवडतात. प्रकाशन व्यवस्था प्रयोगशील हवी. म्हणून आम्ही मुलांसाठी दर्जेदार पुस्तकांवर काम करतो. प्रादेशिक पुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावर उत्तम पुस्तके आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

केवळ भारतच नव्हे तर जगाचा विचार करता, अगदी युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनमध्येही पुस्तकांविषयी जागरूकता दिसून येते, असे साकेत भांड म्हणाले.

पुस्तक प्रकाशन संस्थांच्या वितरण व्यवस्थेत काळानुरूप बदल झाला आहे. ज्यांनी बदल स्वीकारले ते यात यशस्वी आहेत. पुस्तकांची ऑनलाइन विक्री वाढली. कोव्हिड काळात या विषयावर अभ्यासाची संधी मिळाली. विषयांची मागणी बदलली असून शेअर मार्केट, धार्मिक पुस्तके, हिंदुत्वावर मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत पुस्तकांना मागणी आहे. बाल वांग्ड्मयावर तर खूप चांगले लिखाण आहे.

— साकेत भांड, (साकेत प्रकाशन)

वाचनसंस्कृती अजूनही कायम आहे. ई बुक्स असली तरीही पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा आनंद वेगळा. सध्या राजकीय पुस्तके, प्रेरणादायी पुस्तके, ज्वलंत विषयांवर किंवा एकदमच आऊट आॅफ द वे पुस्तकांना पसंती आहे. आम्ही नुकतेच एका शाळेत प्रदर्शन लावले तेव्हा मुलांनी खूप छान प्रतिसाद दिला. वाढदिवसाला किंवा गिफ्ट दिली जातात. याला वाचनसंस्कृती म्हणतात.

— अप्रुप देशपांडे, (राजहंस प्रकाशन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT