

Gokul Election Officer Transfer
esakal
Gokul Chairman Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील राजकीय घडामोडी तापलेल्या असतानाच निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांच्या पदोन्नतीने बदलीचे आदेश शनिवारी (ता. ३१) निघाले. सुट्टीच्या दिवशी शासनाने हा आदेश काढल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, गोकुळच्या राजकीय वर्तुळातही या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.