ज्ञानेश कुमार यांची खुर्ची धोक्यात? ‘इंडिया’ आघाडीचा मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात जनता महाभियोग, नेमके काय आरोप केले?

INDIA Alliance Moves Public Impeachment Against CEC Gyanesh Kumar : या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे खासदार आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
INDIA Alliance Moves Public Impeachment Against CEC Gyanesh Kumar

INDIA Alliance Moves Public Impeachment Against CEC Gyanesh Kumar

esakal

Updated on: 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत ‘इंडिया’ आघाडीने त्यांच्या विरोधात ‘जनता महाभियोग’ प्रस्ताव मांडला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या विशेष बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.

या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे खासदार आणि प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्य निवडणूक आयुक्तांकडून स्वतंत्रपणे काम केले जात नसून ते सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली निर्णय घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

Loading content, please wait...