World Food Day  sakal
लाइफस्टाइल

World Food Day 2023: आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर आहारात समाविष्ट करा 'या' गोष्टी

दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो.

Aishwarya Musale

दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने जागतिक अन्न दिन हा उपक्रम  सुरू केला. 1981 मध्ये पहिल्यांदा जागतिक अन्न दिन साजरा केला गेला होता. तेव्हापासून दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जाऊ लागला. या दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे.

दरवर्षी जागतिक अन्न दिनानिमित्त लोकांना अन्न सुरक्षा आणि पौष्टिक आहाराची गरज याविषयी जागरुक केले जाते. लोकांसाठी अन्न महत्वाचे आहे परंतु शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक अन्न खूप महत्वाचे आहे.

पौष्टिक आहार म्हणजे काय, आहारासाठी आरोग्यदायी अन्न कोणते हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. जागतिक अन्न दिनानिमित्त, आपण आरोग्यासाठी फायदेशीर सकस आहाराबद्दल जाणून घेऊया.

हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवन करा

निरोगी शरीरासाठी भाज्यांचे सेवन महत्वाचे आहे. हिरव्या भाज्या आणि ताजी फळे भरपूर प्रमाणात पोषक असतात. दररोज फळे आणि भाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

ड्राय फ्रूट्समुळे शरीर मजबूत होते

तसेच बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड इत्यादी ड्राय फ्रूट्सचा आहारात समावेश करा. ड्राय फ्रूट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात. हे तुमच्या शरीराला विविध आजारांशी लढण्यास मदत करतात.

रोजच्या आहारात डाळींचा समावेश करा

रोज कडधान्य खावे. डाळींचे अनेक प्रकार आहेत आणि त्या सर्वच तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. वटाणा, मसूर, हरभरा, मूग इत्यादींचा आहाराचा भाग बनवा. डाळीमध्ये प्रथिने, खनिजे आणि पौष्टिक घटक असतात, जे तुम्हाला आजारांपासून वाचवण्यास मदत करतात.

साखर आणि मीठाचा वापर कमी करा

अतिरिक्त साखर आणि मीठ दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे तुमच्या आहारात साखर आणि मीठाचा कमीत कमी समावेश करा. मधुमेहाच्या रुग्णांना साखर खाण्यास मनाई आहे. तसेच अति मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Nanded Dasara: नांदेडमध्ये दसरा महोत्सव उत्साहात; हल्ला-महल्ला मिरवणुकीत हजारो शीख भाविकांचा सहभाग

Pune Crime : टीव्ही बंद करायला सांगितला म्हणून केली वडिलांची हत्या; ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेने कोथरुड मध्ये खळबळ

Teacher Recruitment: मराठवाड्यात शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! ४५७ समन्वयक पदांसाठी ऑनलाइन परीक्षा १ ते ५ डिसेंबर

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; आता E-kyc केलेल्या बहिणींनाच मिळणार लाभ, दिवाळीतील हप्ता पडणार लांबणीवर

SCROLL FOR NEXT