World Heart Day
World Heart Day esakal
लाइफस्टाइल

World Heart Day : ‘या’ जीवनसत्वांची कमतरता वाढवू शकते हृदयविकाराचा धोका, या पदार्थांचा करा आहारात समावेश

सकाळ डिजिटल टीम

मागील काही वर्षांपासून जगभरात हृदयविकाराने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यामागे खरं तर अनेक कारणे आहेत. बिघडलेली जीवनशैली, फास्टफूडचे वाढलेले प्रमाण, वाढलेलं वजन, व्यायामाचा अभाव आणि वैद्यकीय तपासणीचा अभाव ही यामागची कारणे असू शकतात.

हृदयविकाराचे प्रमाण आता तरूणाईमध्ये देखील वाढताना दिसत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांनी नियमितपणे वैद्यकीय तपासणी करणे हे आवश्यक आहे. याकडे कुणीही दुर्लक्ष करता कामा नये.

संतुलित आहार न घेणे हे देखील हृदयविकारामागचे सर्वात मोठे कारण असू शकते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. जीवनसत्वे आणि आवश्यक पोषकतत्वांची कमतरता यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

हृदयविकाराचा वाढता धोका टाळण्यासाठी आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी २९ सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो.

काही जीवनसत्त्वांची कमतरता ही हृदयविकारासाठी हानिकारक ठरू शकते. चला तर मग कोणती आहेत ही जीवनसत्वे ? याबद्दल जाणून घेऊयात.

व्हिटॅमिन B12

हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन B12 चा आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे कोरोनरी आजार, मायोकार्डिअल इन्फेक्शन, स्ट्रोक्स आणि हृदयविकाराच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

या व्हिटॅमिनच्या अभावामुळे रक्ताभिसरण आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे, हे जीवनसत्व असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. मासे, अंडी, मांस आणि दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, बिन्स आणि मटार हे व्हिटॅमिन B12 चे प्रमुख नैसर्गिक स्त्रोत आहेत. त्यामुळे, या गोष्टींचा आहारात जरूर समावेश करा.

व्हिटॅमिन D

व्हिटॅमिन B12 प्रमाणेच व्हिटॅमिन D ची शरिरात कमतरता असणे हे हृदयविकारासाठी धोक्याची घंटा असू शकते. त्यामुळे, ज्या लोकांच्या आहारात या जीवनसत्वाची कमतरता आहे, त्यांना हृदयविकाराचा झटका, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, धमनी रोग आणि स्ट्रोक यांसारख्या हृदयाशी निगडित असलेल्या समस्या विकसित होण्याचा धोका जास्त असू शकतो.

शिवाय, या स्थितीमुळे मधुमेहाचा, उच्च रक्तदाबाचा धोका देखील वाढू शकतो. या सर्व कारणांमुळे तुमच्या आहारात ड जीवनसत्वाचे पुरेसे प्रमाण राखणे हे अतिशय महत्वाचे आहे.

सॅल्मन, ट्यूना आणि मॅकेरेल सारखे मासे यामध्ये व्हिटॅमिन D चा प्रमुख स्त्रोत आहे. मशरूम, दूध, संत्र्याचा रस आणि तृणधान्ये यांसारख्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये व्हिटॅमिन D भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे, या खाद्यपदार्थांचा समावेश तुमच्या आहारात करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT