World Hepatitis Day Sakal
लाइफस्टाइल

World Hepatitis Day: पावसाळ्यात हिपॅटायटीसचा मोठा धोका, 'या' टिप्स कुटुंबासाठी महत्त्वाच्या!

World Hepatitis Day: पावसाळ्यात हिपॅटायटीसचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. हा दूषित खाद्यपदार्थ किंवा पाण्यामुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. या आजारापासून बचाव करण्साठी कुटुंबाची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

World Hepatitis Day: पावसाळ्यात अनेक आजारांना लोक बळी पडतात. पावसाळ्यात अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे गंभीर आजार डोके वर काढतात. हिपॅटायटीस यापैकी एक गंभीर आजार आहे. हा एक संसर्गजन्य आजार आहे. जो दूषित खाद्यपदार्थ आणि पाण्यातून होतो. या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २८ जुलै हा दिवस जागितक हिपॅटायटीस दिन म्हणून साजरा केला जातो. या आजारापासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञांच्या मते कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

स्वच्छ पाणी

पावसाळ्यात स्वच्छ पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कारण पावसाळ्यात जलप्रदुषण ही एक सामान्य समस्या आहे. यामुळे हिपॅटायटीस आजार होऊ शकतो. यामुळे उकळून किंवा फिल्टर केलेले पाणी प्यावे. तसेच घराबाहेर जाताना किंवा प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

ताजे खाद्यपदार्थ

पावसाळ्यात निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी स्वच्छ पाण्याबरोबरच ताजे खाद्यपदार्थांचे सेवन करावे. रस्त्यावरचे अशुद्ध आणि उघडे पदार्थ खाणे टाळावे. घरीच शिजवलेले ताजे अन्न खावे. रोजच्या आहारात हंगामी फळ आणि भाज्यांचा समावेश करावा.

हात स्वच्छ धुवावे

या आजारापासून बचाव करण्यासाठी हाताची स्वच्छता ठेवावी. कोणताही पदार्थ खाण्यापुर्वी हात स्वच्छ धुवावे.

पुराच्या पाण्यात जाणे टाळावे

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण होते. अशात अनेकांना जाण्याची इच्छा होत. पण असे केल्यास हिपॅटायटीस आजार होण्याची शक्यता असते. यामुळे पुराच्या पाण्याच्या संपर्कात येऊ नका.

सांडपाण्याची योग्य विल्हेवाट

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी सांडपाण्याची आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. ज्या ठिकाणी योग्यरित्या विल्हेवाट झालेली नाही तेथे जाणे टाळावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT