World Hypertension Day 2024: Sakal
लाइफस्टाइल

World Hypertension Day 2024: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

World Hypertension Day 2024: ब्लड प्रेशरची समस्या कमी करायची असेल तर आहारात बदल करणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

World Hypertension Day 2024: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक लोकांना उच्च रक्तदाबाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जागतिक उच्च रक्तदाब दिन दरवर्षी 17 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस या विषयाविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. तुम्हाला रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा हे जाणून घेऊया.

कोणती लक्षणे दिसतात

वारंवार चक्कर येणे

थकवा जाणवणे

धूसर दृष्टी

तहान आणि भूक वाढली

थंडी जाणवणे

मॅग्नेशियम समृद्ध आहार

रक्तदाब नियंत्रणात करण्यासाठी आहारात मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असलेल्या अशा पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. मॅग्नेशियम युक्त आहार घेतल्यास नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढते. यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. मॅग्नेशियम आहारासाठी हिरव्या भाज्या, बिया, सोयाबीन, कडधान्य आणि गहू इत्यादींचे सेवन करावे.

व्हिटॅमिन डी

ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे, त्यांनी व्हिटॅमिन डी समृद्ध आहार घेणे देखील महत्त्वाचे आहे. दररोज सकाळी काही वेळ सूर्यप्रकाशात बसावे. याशिवाय मासे, चीज, गाईचे दूध, सोया दूध, संत्र्याचा रस, तृणधान्ये आणि दलिया, लोणी, दही, कोबी यासारख्या पदार्थांचा आहारात सेवन करावा.

पोटॅशियमयुक्त पदार्थ

पोटॅशियम युक्त आहार घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. पोटॅशियम शरीरातील पेशी निरोगी ठेवते. रोजच्या आहारात 4,700 मिलीग्राम पोटॅशियम घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही केळी, पालक, बटाटा यासारख्या खाद्यपदार्थांचे सेवन करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT