World Hypertension Day: Sakal
लाइफस्टाइल

World Hypertension Day 2024: दररोज 10 मिनिटे 'या' योगासनांचा करा सराव, तणाव होईल कमी

World Hypertension Day 2024: त्यामुळे तणाव आणि चिंता वाढून नैराश्य येऊ शकते. तणाव कमी करण्यासाठी कोणत्या योगासनांचा सराव करावा हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Yoga Tips: चिंता आणि नैराश्य जाणवू लागते. याशिवाय एकाकीपणा आणि उदासपणामुळे देखील मूड बदलू शकतो. अनियमित खाण्याच्या सवयी, नियमित व्यायामाचा अभाव, निद्रानाश यामुळे मेंदूला थकवा जाणवू लागतो. त्यामुळे तणाव आणि चिंता वाढून नैराश्य येऊ शकते. तणाव कमी करण्यासाठी कोणत्या योगासनांचा सराव करावा हे जाणून घेऊया.  

मार्जरासन

तणाव कमी करण्यासाठी तुम्ही मार्जरी योगाचा सराव करू शकता. या आसनामुळे श्वासोच्छवासावर नियंत्रण येते. यामुळे मनाला शांती मिळते. मार्जरासनाच्या 10 मिनिटांच्या नियमित सरावाने तणावमुक्त होऊ शकता. 

मार्जारासन कसे करावे

मार्जारासन करण्यासाठी सर्वात आधी सपाट जागेवर खाली सरळ बसावे. नंतर दोन्ही गुडघे पुढे नेऊन गुडघ्यांवर बसावे.

नंतर दोन्ही हात गुडघ्याच्या पुढे न्या आणि खाली टेकवा.

त्यानंतर दोन्ही हातांच्या मनगटांवर भार टाकत नितंबाचा भाग वर आणायचा प्रयत्न करा.

दोन्ही मांड्यावरच्या बाजूला नेत सरळ रेषेत आणण्याचा प्रयत्न करा.

या मुद्रेमध्ये तुमच्या छातीचा भाग जमिनिला समांतर असेल,समोरून पाहणाऱ्याला तुम्ही मांजरीच्या पोझमध्ये दिसाल.

नंतर मोठा श्वास घ्या आणि डोक्याचा भाग मागच्या बाजूला आणा. यानंतर पाठीचा कणाच्या शेवटचा भाग वर आणण्याचा प्रयत्न करा.

आता श्वास सोडताना डोके खाली नेऊन तोंडाखालच्या हनुवटीने छातीला स्पर्श करा.

सुखासन

तणाव कमी करण्यासाठी सुखासन करणे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही सुमारे 10 मिनिटे सुखासनाचा सराव करू शकता. हा योग मनाला शांत ठेवतो. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. सुखासनाच्या सरावानेही रक्ताभिसरण सुधारता येते. सुखासन करण्यापुर्वी पोट साफ असले पाहिजे.

बालासन

बालासन केल्याने तणाव कमी करण्यास मदत होते. बालसनामुळे केवळ मानसिक ताण कमी होत नाही तर शारीरिक ताणही कमी होतो. बालसनाचा सराव केल्याने शरीर ताणले जाते आणि मूड सुधारतो. तसेच तणावाची पातळी कमी होऊ शकते. 

बालासन कसे करावे

सर्वात आधी जमिनिवर गुडघ्याच्या सहाय्यावर बसावे.

दोन्ही पायाची तळवे आणि टाचांना एकत्रित आणा

हळूहळू आपले गुडघे शक्य तितके पसरवा.

दीर्घ श्वास घ्या आणि पुढे झुका.

दोन्ही मांड्यांच्या मध्ये पोट घ्या आणि श्वास सोडा.

कंबरेच्या मागच्या बाजूवर जास्त ताण देऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT