World Lung Cancer Day 2024:  Sakal
लाइफस्टाइल

World Lung Cancer Day 2024: 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकतो फुफ्फुसाच्या कर्करोग, वेळीच घ्या आरोग्याची काळजी

World Lung Cancer Day 2024: फुफ्फुसाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

World Lung Cancer Day 2024: दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस जागतिक फुफ्फुस कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. फुफ्फुसाचा कर्करोग ही एक वेगाने वाढणारी गंभीर समस्या आहे, ज्यामुळे दरवर्षी लाखो लोक आपला जीव गमावतात. या दिवसानिमित्त जाणून घेऊया त्याची लक्षणे कोणती आणि फुफ्फुसाची कशी काळजी घ्यावी.

मेडिकल रिपोर्टनुसार धुम्रपान केल्याने फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. धुम्रपान करणाऱ्यांना आणि धुराच्या संपर्कात असलेल्या लोकांनाही जास्त धोका असतो. धुम्रपानामुळे फुफ्फुसांच्या पेशींचे आरोग्य धोक्यात येऊन कर्करोग होतो.

लक्षणे

सतत खोकला

खोकल्यातून रक्त येणे

श्वास घेण्यात अडचण

छातीत दुखणे

वजन कमी होणे

हाड आणि डोकेदुखी होणे

कोणाला जास्त धोका आहे

या लोकांना जास्त धोका आरोग्य तज्ञांच्या मते अनेक कारणांमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुसार उपचार केले पाहिजे. जे लोक रसायनांच्या अधिक संपर्कात असतात त्यांना देखील धोका असू शकतो. ज्या लोकांच्या कुटुंबात आधीच या प्रकारची समस्या आहे त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असू शकतो.

फुफ्फुसाची कशी काळजी घ्याल

फुफ्फुसाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी धुम्रपान बंद करावे.

तुम्ही रासायनिक कारखान्यात काम करत असल्यास, मास्क आणि सर्व संरक्षणात्मक उपकरणे सतत वापरावी.

घरातील प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी देखील हे खूप महत्वाचे मानले जाते, सतत त्याच्या संपर्कात राहण्यामुळे फुफ्फुसाचे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.

याशिवाय फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थांसोबतच नियमितपणे व्यायाम करावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Luggage Rules : विमानासारखेच नियम रेल्वेमध्येही लागू होणार! , ‘फर्स्ट एसी’मध्ये ७० किलो पर्यंतच सामान मोफत नेता येणार

IND vs SA, 4th T20I : शुभमन गिल खेळणार नाही, मैदानातही पोहचला नाही; मोठं कारण आलं समोर

SHANTI Bill: अणुऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा! शांती विधेयक लोकसभेत मंजूर; का ठरणार गेमचेंजर?

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : तेलंगणा विधानसभा अध्यक्षांनी पाच याचिकांच्या संदर्भात अपात्रता याचिका फेटाळून लावली

SCROLL FOR NEXT