World Saree Day
World Saree Day Sakal
लाइफस्टाइल

World Saree Day : होम मिनिस्टर्सना भूरळ घालणारी पैठणी अन् तिचा इतिहास

सकाळ डिजिटल टीम

World Saree Day : प्रत्येक महिलेला साड्या नेसण्याची आणि वेगवेगळ्या साड्या विकत घेण्याची आवड असते. त्यात जर ती साडी पैठणी असेल तर, गोष्टच निराळी. प्रत्येक महिलेला आपल्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये एकतरी पैठणी असावी अशी इच्छा असते.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

त्यात आज आंतरराष्ट्रीय साडी दिन साजरा केला जात असून, महाराष्ट्राचं महावस्त्र साड्यांची महाराणी अशी बिरूदं मिरवणाऱ्या पैठणीचा मानच वेगळा आहे. आजच्या आंतराष्ट्रीय साडी दिवसानिमित्त पैठणीचा इतिहास खास तुमच्यासाठी

भारतात अतिप्राचीन काळापासून साडी नेसण्याची परंपरा आहे. प्राचीन काळातील शिल्पांवरुन भारतात साडी नेसण्याची पद्धत व साडीचे प्रकार लक्षात येतात. भारतात प्रत्येक प्रांतातील साडीचा प्रकार व नेसण्याची पद्धत निरनिराळी आहे.

जसे की राजस्थान - बांधणी, घागरा ओढणी, बंगालची पदर घेण्याची विशिष्ट पद्धत - जामधनी, दक्षिण भारतातील नारायण पेठी, इरकली, पोचमपल्ली कांजीवरम, मध्य प्रदेशातील चंदेरी, गुजरात, कच्छमध्ये उलटा पदर घेण्याची पद्धत असणारी पटोला, ओरिसात इक्कत, केरळ–धर्मावरम, टेम्पल सिल्क, काश्मिरची कशीदा कारी, तर महाराष्ट्राची जरीची नऊवार, सहावार व बनारसचा शालु हे सर्व प्रकार भारतभर प्रसिद्ध आहेत.

पैठणीचा इतिहास

पैठणी हा महाराष्ट्र राज्यातील साडी या पोशाखाचा एक प्रकार आहे.[१] पैठण ही पुरातन काळी महाराष्ट्राची राजधानी होती. या पैठण मध्ये तयार होणारी वैशिष्ट्यपूर्ण शिवकालीन साडी म्हणजे 'पैठणी'.[२]चौकोनी नक्षी तसेच पदरावरील मोराच्या नक्षीमुळे पैठणी लगेच ओळखू येते. भारतातील सर्वात महागड्या साड्यांपैकी एक मानली जाते. ही भारतातील सर्वात प्रसिद्ध साड्यांपैकी एक आहे. ही भारतातील उत्कृष्ट रेशीमपासून बनविली जाते.

पैठणी ही कापसाचा धागा व रेशीम यांच्यापासून हातमागावर विणलेली एक विशिष्ट प्रकारची नक्षी असलेली साडी आहे. या मध्ये पदरावर मोराची तोता-मैना अशी चित्रे असलेले जरीकाम असते. पूर्वी पैठणी फक्त मोरपंखी रंगातच मिळत असे परंतु आता अनेक रंगात मिळते. जुन्या काळी पैठणी मध्ये सुती धागे आणि पदारासाठी रेशीम आणि जर वापरले जायचे. आजकाल मात्र पैठणी ही पूर्णपणे रेशमी आणि पदरावर जर वापरून बनवली जाते.

उभा धागा एका रंगाचा आणि आडवा धागा वेगळ्या रंगाचा वापरून पैठणीला 'धुपछाव' प्रकारचा परिणाम दिला जातो. पैठणीच्या अंगावर कोयरी, आंबा, अश्रफी, बांगडी मधील मोर,अमरवेल ,नारळ, पारवा, पोपट अशी नक्षी आढळते. पदरावर मोर, तोता मैना, पोपट, भौमितिक आकाराची फुले, पदारातील जर पक्की करण्यासाठी लहर नावाची पट्टी, आसावली म्हणजेच फुले असणारे कलश, मुथाडा, बारवा असे विविध नक्षी प्रकार आढळतात.

पैठणीची मोठ्या प्रमाणात निर्यातही केली जाते. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पैठणी जगप्रसिद्ध आहे. येवल्यातील वीणकराना विशेष कर सवलती दिल्यामुळे येथील वस्त्र व्यवसाय वाढला आहे.

येवल्याच्या पैठणीला अधिक मागणी

येवला आणि पैठणी या दोन्ही ठिकाणीच्या साड्यांमध्ये तुलना केली जाते. पैठणची पैठणी ही खरी ओळख असणारी पैठणीची बाजारपेठ पैठण पेक्षा येवल्यातच मोठ्या प्रमाणावर दिसते. पैठणला पर्यटनासाठी आल्यावर लोक पैठणी खरेदी करतात. पण येवला येथे लग्नकार्याचा बस्ता बांधण्यासाठी, खास पैठणी खरेदीसाठी जातात. पैठणला पैठणीचे अनेक निर्माते आहेत. ते व्यापारही करतात. महाराष्ट्रातील एकूण पैठणी उत्पादनात येवल्याचा सुमारे ८० टक्के वाटा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT