World Sickle Cell Awareness Day 2024 esakal
लाइफस्टाइल

World Sickle Cell Awareness Day 2024: सिकलसेल आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय

रक्तपेशीत झालेल्या बदलामुळे सिकलसेल ॲनिमिया, सिकलसेल थॅलेसेमिया यासह अनेक आजार होतात

सकाळ डिजिटल टीम

World Sickle Cell Awareness Day 2024:

‘सिकलसेल’ या आजाराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी आज 19 जून रोजी ‘जागतिक सिकलसेल जागरूकता दिवस’ साजरा केला जातो. सिकलसेल हा एक आजार आहे ज्याचा रक्तातील हिमोग्लोबिनवर वाईट परिणाम होतो. यामुळे शरीरातील लाल रक्तपेशींचा (RBC) आकार बदलतो, आणि त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

सिकलसेल आजार म्हणजे काय?

प्रत्येक निरोगी व्यक्तीच्या रक्तात लाल रक्तपेशी असतात ज्या आकाराने गोलाकार, मऊ आणि लवचिक असतात. जेव्हा या लाल रक्तपेशी त्यांच्या स्वतःच्या आकारापेक्षा लहान धमन्यांमधून वाहतात तेव्हा त्या अंडाकृती आकाराच्या बनतात.

सूक्ष्म धमन्यांमधून बाहेर पडल्यानंतर पेशींच्या लवचिकतेमुळे त्या पुन्हा त्यांचे मूळ स्वरूप धारण करतात. लाल रक्तपेशींचा लाल रंग त्यांच्यामध्ये असलेल्या हिमोग्लोबिन नावाच्या घटकामुळे असतो. (World Sickle Cell Awareness Day 2024)

निरोगी रक्तपेशीतील हिमोग्लोबिन सामान्य प्रकारचे असते. हिमोग्लोबिनचा आकार देखील सामान्य ऐवजी असामान्य असल्याचे दिसून येते. जेव्हा लाल रक्तपेशींमध्ये या प्रकारचा बदल होतो, तेव्हा लाल रक्तपेशी, ज्या सामान्यतः गोलाकार आणि आकारात लवचिक असतात, हा गुणधर्म बदलतात आणि अर्धगोलाकार कठीण होतात, ज्याला सिकल सेल म्हणतात.

या आजारावर वेळीच उपचार न केल्यास आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. आज आपण या आजाराची लक्षणे, कारणे आणि त्याचे उपचार काय असू शकतात याबद्दल जाणून घेऊयात.

सिकलसेल रोगामुळे रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये Hb चेन तयार होतात. त्यामुळे लाल रक्तपेशींचा आकार (RBC) बिघडतो. हिमोग्लोबिन शरीरातील सर्व पेशींना पुरेसा ऑक्सिजन पुरवण्याचे काम करते, परंतु या आजारात हे काम विस्कळीत होते.

असे झाल्याने सिकलसेल ॲनिमिया, सिकलसेल थॅलेसेमिया यासह अनेक आजार होतात. असे दीर्घकाळ राहिल्यास गंभीर आजार होण्याचा धोका असतो, त्यामुळे वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

या आजाराची लक्षणे काय आहेत?

  • सततचा थकवा

  • हाडांमधील वेदना

  • हात-पायावरील सूज

  • इन्फेक्शन होणे

  • डोळ्यांसंबंधी आजार वाढणे

  • मुलांचा विकास संथ गतीने होणे

कसा पसरतो हा आजार

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा आजार अनेक लोकांमध्ये आनुवंशिक कारणांमुळे होतो. जर एखाद्याचे पालक या आजाराने ग्रस्त असतील, तर त्यांच्या मुलांना सिकलसेल आजार होण्याचा धोका जास्त असतो. कधीकधी सिकल सेल जनुक एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात जातात. याशिवाय काही कारणे देखील या आजाराचे कारण बनतात.

यावर काय उपाय आहेत

तज्ज्ञ सांगतात की, सिकलसेल ॲनिमियाने ग्रस्त असलेल्या लोकांना वारंवार रक्ताची गरज असते. या आजारामुळे होणाऱ्या वेदनांवर हायड्रॉक्सीयुरियाचा उपचार केला जातो. सिकलसेल रोग टाळण्यासाठी, विवाहापूर्वी अनुवांशिक समुपदेशन करणे आवश्यक आहे.

कारण, हा आजार अनुवंशिकरित्या अधिक पसरतो. त्यामुळे, भविष्यात, जनुक थेरपी या आजारावर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या थेरपीने या आजाराची तीव्रताही कमी करता येते. मात्र, वेगवेगळ्या रुग्णांच्या लक्षणांनुसार उपचार केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst Reason : उत्तरकाशीमध्ये ढगफुटी का झाली? धक्कादायक कारण आलं समोर, शास्त्रज्ञ म्हणाले लवकरच भारतात...

Jupiter Transit 2025: गुरुंचा कर्क राशीत प्रवेश; या ४ राशींवर ४९ दिवसांत धन, यश आणि संधींचा वर्षाव!

Ravikiran Ingavle : रविकिरण इंगवलेंसह ८० जणांवर गुन्हा, परवाना न घेता रॅली काढल्याचा परिणाम

Mumbai Kabutar Khana : कबुतरांमुळे इमारतींवर रासायनिक परिणाम, मुंबई शहराच्या अभ्यासातील माहिती; ३,५०० कबुतरे एकाच ठिकाणी

Latest Marathi News Updates Live : दादरमध्ये कबुतरखानाबंदी विरोधातील जैन समाजाचे आंदोलन मागे

SCROLL FOR NEXT