Role of Sports Journalists in Digital Media Era: क्रीडा हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या खेळात माहिर असतात किंवा एखाद्या खेळाच्या मॅचेस बघायला काहींना फार आवडतं. पण या सगळ्याची खबर मिळते ती या क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या पत्रकारांमुळे.
दरवर्षी जगभरात 2 जुलै रोजी जागतिक क्रीडा पत्रकार दिन साजरा केला जातो. मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंसोबतच त्यांचा यशस्वी प्रवास, मेहनत, भावना आणि त्यांच्या आयुष्यातील कहाण्या आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या क्रीडा पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
या खास दिवसाची सुरुवात आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघटनेने (AIPS – Association Internationale de la Presse Sportive) 1994 मध्ये त्यांच्या स्थापनेच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त केली. ही संघटना 1924 मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे स्थापन झाली होती आणि आज ती स्वित्झर्लंडमधील लॉझान इथे कार्यरत आहे.
क्रीडा पत्रकारितेला 1800च्या दशकात सुरुवात झाली. सुरुवातीला ही केवळ श्रीमंत लोकांच्या खेळांपुरतीच मर्यादित होती, जसे की घोड्यांची शर्यत किंवा बॉक्सिंग. त्या वेळी खेळांबद्दल सामाजिक दृष्टीकोनातूनच बातम्या दिल्या जात असत. पण 1820-30 च्या काळात ‘पेनी प्रेस’मुळे स्वस्तात वृत्तपत्र मिळू लागली आणि सामान्य लोकही ती वाचू लागले. त्यामुळे क्रीडा पत्रकारितेचं क्षेत्र हळूहळू वाढत गेलं.
1920च्या दशकात क्रीडा पत्रकारितेला एक वेगळी ओळख मिळू लागली. अनेक वृत्तपत्रांनी खेळांसाठी खास पानं द्यायला सुरुवात केली आणि त्यासाठी खास क्रीडा पत्रकार नेमले. 1880 साली वृत्तपत्रात केवळ 0.4% जागा खेळांसाठी होती, पण 1920पर्यंत तीच जागा 20% झाली.
आज क्रीडा पत्रकारिता फक्त वृत्तपत्रांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ती आता रेडिओ, टीव्ही, डिजिटल आणि सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर पोहोचली आहे.
जागतिक क्रीडा पत्रकार दिन 2025 साजरा करण्यामागे फक्त क्रीडा पत्रकारांचा सन्मान करणे हा एकमेव उद्देश नाही, तर खेळांची माहिती जगभर पोहोचवणं, तरुणांना क्रीडा पत्रकारितेकडे वळायला प्रोत्साहन देणं आणि या क्षेत्रातील मेहनतीचं योग्य मूल्यमापन करणं हेही महत्त्वाचं आहे.
2025 ची थीम
"Empowering Sports Journalism in the Digital Era" म्हणजेच "डिजिटल युगात क्रीडा पत्रकारितेला बळकटी देणे" ही संकल्पना आजच्या बदलत्या मीडिया जगतातील क्रीडा पत्रकारितेच्या नव्या संधी आणि जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करते. आज इंटरनेट, मोबाईल अॅप्स, सोशल मीडिया यांसारख्या माध्यमांमुळे माहिती खूप वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे क्रीडा पत्रकारांची भूमिका अधिक महत्त्वाची आणि जबाबदारीची बनली आहे, कारण त्यांनी दिलेली बातमी अनेक लोकांवर परिणाम करू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.