World Thalassaemia Day 2024  esakal
लाइफस्टाइल

World Thalassaemia Day 2024 : आज आहे जागतिक थॅलेसेमिया डे, जाणून घ्या या गंभीर आजाराबद्दल

थॅलेसेमियाची लक्षणे काय आहेत

सकाळ डिजिटल टीम

World Thalassaemia Day 2024:

जगाच्या कानाकोपऱ्यात असे काही गंभीर आजार आहेत. की, ज्यांची आपल्याला काहीच माहिती नसते. जगभरात असेही आजार आहेत ज्यावर काहीच उपचारही होत नाहीत. काही अनुवंशिक आणि साथीच्या आजारांचाही यामध्ये समावेश आहे. आज आपण अशाच एका फारशा चर्चेत नसलेल्या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत.

थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक आजार आहे आणि तो आई किंवा वडील किंवा दोघांच्या जनुकांमधील दोषामुळे होतो. रक्तातील हिमोग्लोबिन अल्फा आणि बीटा ग्लोबिन या दोन प्रकारच्या प्रथिनांनी बनलेले असते. थॅलेसेमिया या दोनपैकी कोणतेही प्रथिने निर्माण करणाऱ्या जनुकांमध्ये गडबड झाल्यास होतो.

जीन्सच्या अल्फा किंवा बीटा ग्लोबिन स्थितीवर अवलंबून थॅलेसेमियाचे लहान- मोठे आणि मध्यवर्ती प्रकारांमध्ये विभागले गेले आहे.

या रोगाचा उपचार कसा केला जाईल हे रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. लहान वयात निदान झालेल्या मोठ्या थॅलेसेमिया रुग्णांना आयुष्यभर रक्त चढवावे लागते. त्यामुळे त्यांचे आयुर्मान कमी होते. तर अल्पवयीन थॅलेसेमिया रुग्णांमध्ये केवळ अशक्तपणा दिसून येतो.

भारतात दरवर्षी दहा हजारांहून अधिक अर्भके थॅलेसेमियाने ग्रस्त जन्माला येतात. एवढी मोठी संख्या असूनही हा आजार रोखण्यासाठी योग्य ते उपाय केले जात नाहीत.  अल्पवयीन रुग्णांना आपण या आजाराने त्रस्त आहोत याची जाणीव नसते. तसेच, मेजर थॅलेसेमियाचे 12 ते 15 रुग्ण आहेत. (World Thalassaemia Day 2024)

थॅलेसेमियाचे रूग्णांना माहितीच नसते की हा आजार त्यांना झाला आहे. त्यामुळेच त्यावर उपचार करण्यास उशीर होतो.  

थॅलेसेमियाची लक्षणे काय आहेत

  • मुलांची नखे पिवळी पडणे

  • मुलाच्या जबड्यात आणि गालांमध्ये असामान्य दिसू लागतात

  • मूल वयाच्या तुलनेत खूपच लहान दिसते

  • सतत सुकलेला चेहरा

  • मुलांचे वजन वाढत नाही

  • मुलांना दृष्टीदोष होणे.

  • मुलांना श्वास घेण्यात अडचण होणे

ही सामान्य लक्षणे थॅलेसेमियाची आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT