CEO Gifts 500 Employees First-Class Tickets and ₹8.5 Lakh Each sakal
लाइफस्टाइल

World’s Best Boss? 500 कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास तिकीटं आणि 8.5 लाखांची भेट! कोण आहे 'ही' CEO जाणून घ्या

Spanx CEO Surprises Employees with Luxury Gifts Worth ₹8.5 Lakh Each: स्पॅन्क्सच्या सीईओने ५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास तिकीट आणि ८.५ लाखांची भन्नाट भेट दिली!

Anushka Tapshalkar

CEO Who Gave Her Staff First-Class Tickets and Huge Bonus: नुकतेच आंध्र प्रदेश सरकारने खासगी कंपन्यांसाठी नवा नियम मंजूर केला असून आता कर्मचाऱ्यांना दररोज 9 ऐवजी 10 तास काम करावे लागणार आहे. पण अशातच सध्या अमेरिकेतील एका खाजगी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी घेतलेला निर्णय सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

स्पॅन्क्स (Spanx) या कपड्यांच्या कंपनीने मोठा करार झाल्यानंतर आपल्या ५०० कर्मचाऱ्यांना दोन फर्स्ट क्लास तिकीटे आणि प्रत्येकी 8.5 लाखांची रोख भेट दिली. या निर्णयामुळे ऑफिसमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. काही जण तर डायरेक्ट अंटार्क्टिकाला जाण्याची स्वप्न पाहू लागले! पण एवढा दिलखुलासपणा नक्की आहे तरी कोणाचा? आणि नेमका कोणता करार झाला ते जाणून घेऊया.

स्पॅन्क्स कंपनी

स्पॅन्क्स ही अमेरिकेतील अंडरगारमेंट्स, शेपवेअर आणि स्टायलिश कपडे बनवणारी कंपनी आहे. सारा ब्लेकली यांनी 2000 साली ही कंपनी सुरू केली. अटलांटा येथे मुख्यालय असलेली ही कंपनी आता जगभरात आपली उत्पादने विकते.

नुकत्याच ब्लॅकस्टोनसोबत झालेल्या 1.2 अब्ज डॉलर्सच्या कराराचा आनंद साजरा करत, ब्लेकली यांनी 500 कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकीटं आणि प्रत्येकी 8.5 लाखांची रोख भेट दिली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला. त्यात कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे.

दुसरीकडे, कामाचे वाढलेले तास?

स्पॅन्क्स (Spanx) कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी दिलेला मोठा बोनस एकीकडे चर्चेत असतानाच, भारतात मात्र वेगळीच स्थिती आहे. अंध्र प्रदेश सरकारने खासगी कंपन्यांसाठी रोजचे कामाचे तास 9 ऐवजी 10 केले आहेत.

कामाचे वाढलेले तास, त्यातून होणारा थकवा आणि तणाव यामुळे कर्मचाऱ्यांचं समाधान आणि कामातली उत्सुकता कमी होऊ शकते. एका बाजूला काही कंपन्या फक्त नफ्यावर लक्ष ठेवून तास वाढवत आहेत, तर स्पॅन्क्ससारख्या कंपन्या कर्मचाऱ्यांना महत्त्व देत त्यांच्या आनंदासाठी मोठा खर्च करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: पाचोर्‍यातील कृष्णापुरीतील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश

SCROLL FOR NEXT