Yoga For Eye Health
Yoga For Eye Health esakal
लाइफस्टाइल

Yoga For Eye Health : डोळ्यांची दृष्टी मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, जाणून घ्या योग्य पद्धत

Monika Lonkar –Kumbhar

Yoga For Eye Health : आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या आणि नाजूक अवयवांपैकी एक म्हणजे आपले डोळे. डोळ्यांमुळे तर आपल्याला हे जग पहायला मिळते. या नाजूक डोळ्यांची काळजी घेणे, देखील महत्वाचे आहे. डोळ्यांची नीट काळजी घेतली नाही की, दृष्टी कमजोर होऊ लागते.

मागील काही वर्षांपासून लोकांच्या स्क्रिन टाईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे, या सगळ्याचा डोळ्यांच्या दृष्टीवर खोलवर परिणाम होतो. दिवसभर लॅपटॉपवर काम केल्यामुळे आणि मोबाईलचा सतत वापर केल्याने डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे लाल होणे किंवा अंधुक दिसणे, इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात.

इतकच नव्हे, तर डोळे हे डोकेदुखीचे एक कारण आहे. निरोगी डोळ्यांसाठी आणि डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही योगासनांची मदत घेऊ शकता. योगासनांमुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहील आणि डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होईल. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात. (yoga for eye health)

चक्रासन

चक्रासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने पाठ-कंबर मजबूत होते आणि डोळ्यांची दृष्टी सुधारते. यासोबतच तुमचे वजन देखील नियंत्रणात राहते.

चक्रासनाचा रोज सराव केल्याने पचनाच्या समस्यांपासून ही आराम मिळू शकतो. हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही योगा मॅटवर पाठीवर झोपा. त्यानंतर, तुमच्या दोन्ही पायांचे गुडघे वाकवा आणि पायांच्या टाचा शक्य तितक्या तुमच्या नितंबाजवळ आणण्याचा प्रयत्न करा.

त्यानंतर, तुमचे दोन्ही हात कानाच्या दिशेने झुकवा आणि हाताचे तळवे जमिनीवर टेकवा. आता तुमचे पाय आणि तळव्यांचा वापर करून शरीर उचलण्याचा किंवा खेचण्याचा प्रयत्न करा. या स्थितीमध्ये तुम्हाला शरीरात ताण जाणवेल. त्यानंतर, जवळपास ३० सेकंद या स्थितीमध्ये रहा आणि पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या. (Chakrasana)

हलासन

हलासन हे योगासन आपल्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने वजन नियंत्रित राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते. हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर झोपा. त्यानंतर, श्वास घेताना दोन्ही पाय वरच्या दिशेने उचलून डोक्याच्या मागे घ्या.

त्यानंतर, अंगठ्याने जमिनीला स्पर्श करून तुमचे दोन्ही हात जमिनीवर सरळ ठेवा. त्यानंतर, तुमची कंबर जमिनीला समांतर स्थितीमध्ये घट्ट ठेवा. या स्थितीमध्ये तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल. काही सेकंद या स्थितीमध्ये रहा, त्यानंतर श्वास सोडा, आता पुन्हा तुमच्या सामान्य स्थितीमध्ये या. हे योगासन करण्यासाठी तुम्ही योग अभ्यासकाची मदत घेऊ शकता. (Halasana)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT