Yoga For Body Pain esakal
लाइफस्टाइल

Yoga For Body Pain : वाढत्या वयाबरोबर शरीराची अंगदुखी वाढलीय? मग ‘या’ योगासनांमुळे तुम्हाला मिळेल आराम

Yoga For Body Pain : वय वाढले की, शारिरीक समस्या ही मोठ्या प्रमाणात वाढतात. वाढत्या वयाबरोबर पाठदुखी, गुडघेदुखी आणि सांधेदुखी उद्भवणे या समस्या सामान्य आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga For Body Pain : वय वाढले की, शारिरीक समस्या ही मोठ्या प्रमाणात वाढतात. वाढत्या वयाबरोबर पाठदुखी, गुडघेदुखी आणि सांधेदुखी उद्भवणे या समस्या सामान्य आहेत. उठता बसता ही या समस्या येऊ लागतात. जर तुम्ही यावर वेळीच उपचार केले नाही तर या समस्या गंभीर रूप धारण करू लागतात. मग, या वेदना कमी करण्यासाठी अनेक जण औषधांची मदत घेऊ लागतात.

परंतु, या औषधांमुळे तुम्हाला केवळ तात्पुरता फरक पडतो. शिवाय, सतत अशा वेदनाशामक औषधांचा वापर करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे, या वाढत्या वयासोबत सांधेदुखी, पाठदुखी आणि तर शारिरीक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून तुम्ही काही योगासनांची मदत घेऊ शकता. फक्त या योगसानांचा सराव तुम्हाला नियमितरित्या करावा लागेल. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.

वीरभद्रासन

हे योगासन आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने तुमची सांधेदुखी, पाठुदुखी कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे राहा आणि आपले हात जमिनीला समांतर ठेवा. त्यानंतर, तुमचे डोके डाव्या दिशेला वळवा. आता तुमचा डावा पाय ९० अंशात डावीकडे वळवा. काही सेकंद या स्थितीमध्ये रहा. तुम्हाला शरीरात ताण जाणवेल. आता दुसऱ्या बाजूने असाच सराव करा. त्यानंतर, मग सामान्य स्थितीमध्ये या.

सेतूबंधासन

पाठदुखीपासून आणि कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर मानले जाते. या योगासनाचा सराव करण्यासाठी योगा मॅटवर पाठीवर झोपा. त्यानंतर, तुमचे तळवे शरीराजवळ जमिनीला समांतर ठेवा.

आता तुमचे दोन्ही गुडघे वाकवून हळूहळू श्वास घ्या आणि तुमचे शरीर वरती उचलण्याचा प्रयत्न करा. या स्थितीमध्ये असताना तुम्हाला शरीरात ताण जाणवेल. काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीमध्ये परत या.

सेतुबंधासन या योगासनाचा जर तुम्ही नियमितपणे सराव केला तर तुमच्या पाठीचा कणा बळकट होतो. शरीराची लवचिकता वाढते आणि थकवा, अनिदा आणि पचनाची समस्या सुलभ होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Farmer: अधिकारी फोटो काढून गेले अन्... मदतीचा बैलही निघाला आजारी; लातूरच्या शेतकऱ्याच्या दु:खाला अंतच नाही!

Akola News: मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही बुडून मृत्यू; धार्मिक स्नान ठरले अखेरचे, समशेरपूर येथील घटना!

OnePlus Turbo 6X Pro मोबाईलची धमाकेदार एन्ट्री! चक्क 8000mAh एवढी मोठी बॅटरी; लॉन्च होताच डिस्काउंट, किंमत फक्त...

Latest Marathi News Live Update : विदर्भात उष्णतेचा कहर कायम; पुढील चोवीस तासांसाठी धोक्याचा इशारा

Sharad Pawar Congress Merger : शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार? काँग्रेस नेत्यांकडून सूचक वक्तव्य; राहुल गांधी, खर्गे निर्णय घेणार

SCROLL FOR NEXT