Yoga Tips esakal
लाइफस्टाइल

Yoga Tips : रोजच्या धावपळीमुळे हातापायांमध्ये वेदना जाणवतात? मग, 'या' योगासनांच्या सरावामुळे मिळेल आराम

Yoga Tips : कामाच्या गडबडीमुळे शरीराला विश्रांती न मिळाल्यास आपल्या पायांवर दाब येतो. कधी कधी हात देखील दुखतात. ही हातपाय दुखण्याची समस्या नंतर वाढत जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga Tips : रोजचे धकाधकीचे जीवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. कामाच्या गडबडीमुळे शरीराला विश्रांती न मिळाल्यास आपल्या पायांवर दाब येतो. कधी कधी हात देखील दुखतात. ही हातपाय दुखण्याची समस्या नंतर वाढत जाते.

या शारिरीक वेदना कमी करण्यासाठी आणि हातापायांना आराम मिळवण्यासाठी लोक मालिश करतात. मात्र, मसाज केल्याने वेदनेपासून तात्पुरता आराम मिळतो. त्यानंतर, हातपाय पुन्हा दुखायला लागतात. हातापायांच्या या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी योगासने हा कायमस्वरूपी उपचार म्हणून फायदेशीर ठरतो.

योगा तज्ज्ञांच्या मते, हातापायांच्या वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही नियमितपणे योगासने करणे गरजेचे आहे. यामुळे, तुम्हाला निश्चितच आराम मिळेल. अशी काही योगासने आहेत, ज्यांचा नियमित सराव केल्याने हातापायांचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते आणि आपले शरीर हलके होते. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.

भूजंगासन

रोजच्या ताण-तणावापासून आराम मिळवण्यासाठी भूजंगासन हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. यासोबतच, नियमितपणे या योगासनाचा सराव केल्याने हातापायांच्या वेदनेसोबतच, पाठ आणि कंबरदुखीची समस्या दूर होण्यास मदत होते.

भूजंगासन हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे रहा. त्यानंतर, पोटावर जमिनीवर झोपा. त्यानंतर, दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या. त्यानंतर, कंबरेच्या वरचा भाग हा वरच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून संपूर्ण शरीराला ताण बसेल. या दरम्यान, तुमच्या दोन्ही हातांचे कोपरे सरळ ठेवा आणि पाय वाकवताना जास्त ताण देऊ नका. काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या. (Bhujangasana)

सेतूबंधासन

सेतूबंधासन हे योगासन आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या योगासनाला ब्रिज पोझ योगा असे ही म्हटले जाते. हातपाय आणि पाठदुखी दूर करण्यासाठी सेतूबंधासन हे योगासन फायदेशीर मानले जाते. विशेष म्हणजे या योगासनाचा सराव केल्याने हात आण पायांच्या स्नायूंमध्ये रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे, हातापायांचे दुखणे बरे होण्यास मदत होते.

हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर झोपा. त्यानंतर, तुमचे हातपाय खांद्याच्या रूंदीला वेगळे ठेवा आणि तुमच्या पायांचे गुडघे वाकवा. आता हात जमिनीवर सरळ ठेवा. आता दीर्घश्वास घेताना तुमची कंबर वरच्या दिशेने उचला. या दरम्यान तुमचे खांदे आणि डोके सपाट जमिनाला समांतर ठेवा. काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर श्वास सोडताना पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या. (Setubandhasana)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT